शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखड्यास विलंब

By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST

जिल्हा परिषद : तालुकास्तरावरील आराखडे देण्यात होतेय चालढकल

रत्नागिरी : जिल्हा परिषद संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही. तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आल्याने कृती आराखडा तयार करण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला विलंब होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही दरवर्षी ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नदी, नाल्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे जनतेला शासनाकडून टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. गतवर्षी जून महिन्यात १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावली होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तोही दोन-तीन दिवसांनी एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला पायपीट करावी लागली होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावणार असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी डिसेंबरपूर्वी टंचाई कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. मात्र, तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यांना कृती आराखडा सादर करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेतही चर्चा झाली. सभेत टंचाई आराखडा अद्याप तयार का करण्यात आला नाही, आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजूरीसाठी कधी पाठविणार, असे प्रश्न पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये तालुकास्तरावरुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला टंचाई कृती आराखडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी तालुक्यातून अद्याप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आराखडे सादर करण्यात आलेले नाहीत. हे आराखडे येण्यास उशीर झाल्याने जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची धावपळ उडणार आहे. (शहर वार्ताहर)तालुक्याच्या बैठकाच नाहीत...जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येतो. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा पंचायत समितीकडून मागविण्यात येतो. या आराखड्यासाठी तालुक्यामध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. काही तालुक्यांमध्ये कृती आराखड्याबाबत अजूनही बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कसा पाठविणार, असा प्रश्न पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.