शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाणी व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST

चिपळूण : जिल्ह्यातील दुर्गम भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या नियमानुसार पाणीटंचाई नसली तरी अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी ...

चिपळूण : जिल्ह्यातील दुर्गम भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या नियमानुसार पाणीटंचाई नसली तरी अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी लोक वणवण भटकंती करीत आहेत. अनेक लोक पाणी विकत घेत असून पाण्याचा व्यवसाय तेजीत चालला आहे.

कळझोंडीतील विद्युतपोल गंजले

रत्नागिरी : तालुक्यातील कळझोंडी सुंदरवाडील घरकुल वसाहत येथील घरालगतच गेलेल्या विद्युतलाइनचे लोखंडी पोल पूर्णपणे गंजलेले आहेत. त्यामुळे या वस्तीवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.

लसीकरण केंद्राची मागणी

चिपळूण : खेर्डी गावातील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस उपलब्ध व्हावी व खेर्डी येथे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पिंपळी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी लोकांना ताटकळत राहावे लागते.

सभापतींची भेट

खेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, सभापती जगदाळे यांनी सातपानेवाडीला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थी, कामगार यासाठी एसटीची मागणी केली.

आर्थिक गणित विस्कळीत

रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव व महागाई यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे वाढते दर, कडधान्य, डाळींच्या दरातील वाढ, इंधन दरवाढ यामुळे दरमहा आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे. अनेकांना लॉकडाऊनमुळे नोकऱ्या, रोजगार गमवावे लागले आहेत.

बॉण्डपेपरचा तुटवडा

रत्नागिरी : शहरात ३१ मार्चपासून बॉण्डपेपरचा तुटवडा भासत आहे. बॉण्डपेपर विक्रेत्यांचा परवाना अद्याप नूतनीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे बॉण्डपेपर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून बॉण्डपेपरची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : राष्ट्रवादी युवक बेसिक विद्यार्थी व सर्व सेल्स आयोजित जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅगलाइनखाली आयोजित शिबिराला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, प्रदेश सचिव बंटी वणजू, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर उपस्थित होते.

जिल्ह्यातील उद्योजकांना आवाहन

गणपतीपुळे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्य:स्थितीत ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. याशिवाय औषधे, बेड सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशा सर्व लढाया जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विक्रेत्यांचे मास्क लावण्याकडे दुर्लक्ष

रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच काही भाजीविक्रेते, फळविक्रेते, हातगाडीवाले मास्क वापरत नसल्याने धोकादायक ठरू शकतात. त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

विहीर, पाखाडी चोरीस

देवरूख : तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भेलेवाडी येथील भारत निर्माण नळपाणी योजनेतील नवीन विहीर व चौदाव्या वित्त आयोगातून बांधलेली पाखाडी चोरीला गेली आहे. या कामामध्ये अफरातफर झाल्याची चर्चा सुरू आहे.