शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारी सूर्याचे दर्शन घ्यायचे की कचऱ्याचे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:34 IST

भंगार एकत्र करून ते चक्क समुद्राच्या किनारी टाकण्यात आले

रत्नागिरी : शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल हाेत चालली आहे. रस्त्यावर जागाेजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असतानाच  आता ‘सनसेट पाॅइंट’ असणाऱ्या ठिकाणीही कचरा टाकून त्याचे विद्रूपीकरण करण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील समुद्रकिनारी कचरा फेकण्यात आल्याचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी किनाऱ्यावरून सूर्याचे दर्शन घ्यायचे की, कचऱ्याचे ढीग पाहायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी आता बंद पडली आहे. या कंपनीच्या जागी नवीन शिपिंग कंपनी सुरू हाेत आहे. या कंपनीने भारती शिपयार्ड कंपनीतील सगळा भंगार माल गाेळा करण्यास सुरुवात केली आहे. हे भंगार एकत्र करून ते चक्क समुद्राच्या किनारी टाकण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा कचरा टाकण्यात आला आहे, त्या ठिकाणाहून अथांग समुद्राचे दर्शन हाेते. त्याचबराेबर सूर्याेदयाला सूर्याचे मनमाेहक रूप पाहता येते. हा भाग जणू ‘सनसेट पाॅइंट’च म्हणावा लागेल.

या ठिकाणी उभे राहून समुद्रासह सूर्याचे रूप सहज न्याहाळता येते. मात्र, याचठिकाणी भंगार माल माेठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. यामध्ये जुनी कागदपत्रे, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे यासह अन्य साहित्यही आहे. त्यामुळे हा भाग कचऱ्याने व्यापून गेला आहे. हा कचरा काही दिवसांनी समुद्रातही जाण्याची भीती आहे.शहरातील काही सायकलस्वार या भागात सकाळी सायकलिंगसाठी गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनाला आली. त्यांनी हा सारा प्रकार कॅमेराबद्ध केला आणि साेशल मीडियावर याचे फाेटाे व्हायरल झाले. या प्रकारामुळे अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत रत्नागिरीसारख्या पर्यटनस्थळाला कचऱ्यामुळे ग्रहण लागल्याची टीकाही केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग