शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांच्या प्रवासासाठी तासाभराची होतेय प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:01 IST

Pwd Bridge Ratnagiri- मंडणगड तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आंबेत ते म्हाप्रळ या सुमारे २०० ते ३०० मीटरच्या प्रवासाकरिता प्रवाशांना तासाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्देदोन मिनिटांच्या प्रवासासाठी तासाभराची होतेय प्रतीक्षाम्हाप्रळ- आंबेत रो-रो सेवा पहिल्या दोन दिवसात फुल्ल, लांबच लांब रांगा

मंडणगड : तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आंबेत ते म्हाप्रळ या सुमारे २०० ते ३०० मीटरच्या प्रवासाकरिता प्रवाशांना तासाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे.आंबेत पुलाच्या दुरूस्ती कामासाठी दिनांक १० फेब्रुवारीपासून पूल सर्वच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुमारे ९० लाख रुपये खर्च करून फेरीबोट (रो-रो) सेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात मंडणगड, दापोली याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसातच या रो-रो सेवेवर अतिरिक्त भार पडला. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांचा क्रमांक येत होता. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी तिष्ठतच राहावे लागले होते. पर्यटकांचा वाढता ओघ पाहता आणि एका बोटीवर भार येत असल्याने रो-रो व्यवस्थापनाने आणखी एक बोट वाहतुकीसाठी आणली आहे.प्रवासासाठी आर्थिक भुर्दंडपूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केल्याने नियमित आंबेत, गोरेगाव, माणगाव याठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे म्हाप्रळ येथील ग्रामस्थांनी रो-रो सेवा स्थानिकांसाठी माफ करावी, अशी मागणी केली आहे.छोटे उद्योग सुरूफेरीबोट सुरू झाल्याने म्हाप्रळ परिसरातील ग्रामस्थांनी प्रवाशांच्या सोयीसाठी पाणी, अल्पोपहार यासारखे छोटे उद्योग सुरू केले आहेत. त्यातून रोजगार उपलब्ध करण्याची संधी अनेकांनी साधली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी