शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:21 IST

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे.  याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल

ठळक मुद्देत्यामुळे सध्यातरी  उमेदवारांना शिक्षक भरतीबाबत प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला दीड वर्ष झाले तरी प्रक्रिया मात्र अद्यापही रेंगाळली आहे.  याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात असले तरी पोर्टलचा हा खेळ केव्हा संपणार असा सवाल उमेदवारांमधून करण्यात येत आहे.

शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित आले.  पवित्र पोर्टलवर राज्यभरातून एक लाख २३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी १२ हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिराती प्रसिध्द केल्या. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात प्रक्रिया केव्हा सुरू होणार याचीच उमेदवारांना प्रतिक्षा आहे.

शिक्षक भरतीकरिता राज्यातील १४ खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय एक हजार २४१ शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग सुरळित झाला आहे. पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार थेट शिक्षकांची निवड केली जाणार आहेत. मात्र खासगी शैक्षणिक संस्थांना उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षक निवड करण्याचे अधिकार दिले आहेत. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्याची नियमावलीही तयार केली आहे. मुलाखत व वर्गात शिकविण्याच्या प्रक्रियेचे व्हीडिओ शुटिंग करण्याची अट देखील घालण्यात आली आहे. मात्र मुलाखत घेण्याची प्रक्रिया वेळकाढू आहे. शिवाय  मुलाखत निवडीवरून पुन्हा शंका उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याबाबत विनंती केली होती. संस्थांनी विनंती मान्य करून प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र प्रक्रिया प्रत्यक्षात लांबली आहे.

उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे. मात्र इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी २० टक्के राखीव जागा मिळाव्यात, बीएड् अर्हता धारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या विषयांवर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. २० टक्के राखीव जागा विषयावरील याचिकेबाबत अंतरिम आदेश झाले आहेत. मात्र अंतिम आदेशानंतर स्पष्टता येणार आहे, त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली होणार आहे. मार्गदर्शक सूचना पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्यातरी  उमेदवारांना शिक्षक भरतीबाबत प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीProfessorप्राध्यापक