शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 22:24 IST

४७ आपद्ग्रस्त सध्या तिवरे हायस्कूलमध्ये राहत असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन येणाऱ्या असंख्य संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 

चिपळूण : तालुक्यातील तिवरे येथे धरण फुटीची दुर्घटना घडल्यानंतर वाचलेले व घरांचे नुकसान झालेले ४७ आपद्ग्रस्त सध्या तिवरे हायस्कूलमध्ये राहत असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन येणाऱ्या असंख्य संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण मंगळवारी २ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता फुटले. या दुर्घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले होते.   त्यापैकी २० मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरातील भांडी, चूल, सिलेंडर, शेगड्या, सर्व सामान वाहून गेले आहे. गेले तीन दिवस तेथील लोकांची चूल पेटलेली नव्हती. काही सामाजिक संस्थांनी मदत व रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या सर्वांची जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच घटना घडल्यापासून तिवरे येथील पोषण आहाराची जेवण करणारी स्थानिक महिला हर्षदा हरिश्चंद्र शिंदे व विश्वास रामजीराव शिंदे या दोघांनी जेवणाची व्यवस्था केली होती. काही संस्थांनी व लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.यामध्ये समृध्द कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिध्देश जाधव यांनी ४० टॉवेल, २४ साबण, २४ कोलगेट व काही नऊवारी साड्या, सिध्देश लाड मित्रमंडळ यांच्याकडून टॉवेल, ५० किलो तांदूळ, १० किलो साखर, १० लीटर तेल, रामशेठ रेडीज यांच्याकडून तांदूळ, ४ बिस्कीटचे बॉक्स, तहसीलदार कार्यालयाकडून २८ ब्लॅकेट, स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा केंद्र शिळ-खेडशी, अमित गॅस एजन्सीकडून ३ सिलेंडर, २ शेगड्या, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जयंत साडी सेंटर यांच्याकडून १५ साड्या, मुलांना कपडे, नवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रितम देवळेकर या गेल्या तीन दिवसापासून मदतीचे कार्य करीत आहेत. त्यांनी जेवण, पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांची ७ ते ८ जणांची टिम या ठिकाणी कार्यरत आहे. तिवरे भेंदवाडी या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतील तुकाराम शंकर कनावजे, सखाराम धोंडू तांबट, जानकी तुकाराम कदम, अजित अनंत चव्हाण, नारायण रघुनाथ गायकवाड, कृष्णा बाळू कातुर्डे, चंद्रभागा कृष्णा कातुर्डे यांची व्यवस्था तिवरे न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेत करण्यात आली आहे. त्या शाळेतील शिक्षक श्रीधर रघुनाथ जोशी हे देखील सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण