शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाला ओढ असते हिशामुद्दीन बाबांच्या दर्ग्याची

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

शेकडो वर्षांची परंपरा : एकात्मतेचे दर्शन देव घडवतात अन् आपण...?

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरीदेशात जाती-धर्मावरून वारंवार वाद उत्पन्न होतात. दंगे-धोपे होतात. देवाच्या ठिकाणी एकजण उच्च, तर दुसरा नीच असा भेदाभेद होतो. प्राचीन काळापासून चालत आलेले हे वाद विज्ञानयुगातही तसेच सुरु आहेत. पण, देवाच्या दरबारी असा भेदाभेद नाही. कारण रत्नागिरीचं दैवत असलेल्या विठुरायालाही हिशामुद्दीन दर्ग्याची ओढ लागलेलीच असते. देवाच्या ठायीही एकात्मता आहे, देवानेही ‘सारी मानवजात एकच’, असाच संदेश दिला आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो वर्षांपासून श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येत आहे. कार्तिकोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता श्री विठ्ठलाची पंचामृती पूजा झाल्यानंतर काकडारती होते. भजन झाल्यानंतर मंदिरातून श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडतो. राधाकृष्ण नाक्यातून रथ धनजीनाका येथे येतो. रथ हिशामुद्दिन बाबांच्या दर्ग्याजवळ येणार असल्याने कमिटीतर्फे दर्गा त्या दिवशी बंद केला जात नाही. शिवाय दिवेही सर्वत्र सुरू ठेवले जातात. त्याचवेळी पालखीतील नारळ दर्ग्याला अर्पण केला जातो. त्यानंतर पालखी दर्ग्यापुढील श्री दत्ताच्या घुमटीकडे येताच ‘कर्पुराती’ होते. भाविक लोटांगणे घालतात. त्यानंतर रथ धामापूरकर गल्लीतून धनजी नाकामार्गे पुन्हा देवळाकडे परततो. आजपर्यंत शेकडो वर्षांच्या या परंपरेमध्ये अजितबात कधीही खंड पडलेला नाही, शिवाय दोन्ही धर्मातील मंडळी श्रध्देने या सोहळ्यात सहभागी होतात. शांती, सौख्य व एकात्मतेची झलक यातून दिसून येते. पहाटेच्या वेळी रथ दर्ग्याजवळ येतो. श्रध्देने नारळ दर्ग्यात ठेवला जातो. त्यादिवशी दर्गा रात्रीच्या वेळी बंद केला जात नाही. भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्यात येत असल्याचे मंदिराचे ट्रस्टी अशोक मयेकर यांनी सांगितले.देवालाही एवढी आस असते. देवाच्या ठायीही एकात्मता जोपासली जाते. मग राष्ट्रीय एकात्मतेची पताका वाहणाऱ्या आपणामध्ये ही माणुसकीची आस केव्हा येणार? हाच एक प्रश्न आहे.