शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राणे, स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते पाहा; विनायक राऊत यांची टीका

By मनोज मुळ्ये | Updated: June 27, 2023 12:08 IST

'मंत्री राणेंनी कितीजणांना रोजगार दिला'

रत्नागिरी : स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे, हे न पाहता केंद्रीय मंत्री नारायण राणे इतर प्रकरणांमध्ये अधिक लक्ष घालत आहेत. नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, आपण मंत्री झाल्यानंतर कितीजणांना रोजगार दिला, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी आपल्या भाषणातील सर्वाधिक वेळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करण्यामध्येच घालवला, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावरही टीका केली. राणे यांच्या राजापुरात झालेल्या जाहीर सभेला इकडून तिकडून फक्त ७०० माणसे आली होती. त्यात आपल्या पक्षाने काय केले, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच अधिक वेळ घालवला, असे ते म्हणाले.ईडीने दणका दिल्यानंतर त्यापासून वाचवण्यासाठी भाजपचे पाय चाटण्यासाठी गेलेले उपरे नेते असाही त्यांनी मंत्री राणे यांचा उल्लेख केला. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे, ते न राहता रमेश मोरे, जयंत जाधव यांच्याबद्दल राणे विचारणा करत आहेत. त्यांच्याबाबतचा तपास पोलिसांनी केला आहे आणि ज्यांचे स्वत:चे हात बरबटलेले आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची नौटंकी केली आहे, असे सांगताना खासदार राऊत यांनी श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यवियज भिसे, अंकुश राणे अशा नावांचा उल्लेखही केला.आपल्या ४४ मिनिटांच्या भाषणातील ३६ मिनिटे उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेषाने बोलणा-या राणे यांनी मंत्रिपदाच्या काळात आपण कितीजणांना रोजगार दिला, हे सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांनी जे दिले, ते मिंधे सरकार देऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले. राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याचेही ते म्हणाले.यावेळी खासदार राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली. जे. के. फाईल्स कंपनीच्या १८ एकर जागेवर भूमाफियांचा डोळा असल्याचा आरोप करतानाच त्यांनी हा उद्योग बंद होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे