शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या घरी ग्रामस्थ साजरा करणार गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:56 IST

हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे.

ठळक मुद्दे हातिस, टेंब्ये ग्राम कृती दलाचा अभिनव उपक्रमचाकरमान्यांच्या घरात स्थानापन्न होणार गणेशमूर्ती

रत्नागिरी : गावी आल्यावर क्वारंटाईन, मुंबईत गेल्यावर पुन्हा क्वारंटाईन, त्यामुळे गणपतीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची द्विधा अवस्था झाली आहे. चाकरमान्यांची ही अडचण लक्षात घेऊन हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे.शिमगोत्सवासाठी गावी पालखीसाठी आलेले चाकरमानी गेले दोन ते अडीच महिने लॉकडाऊनमुळे गावीच अडकून पडले होते. हे सर्वजण मुंबईला परत गेल्यानंतर पुन्हा गणेशोत्सवासाठी गावी येणे त्यांना शक्य नाही.

त्यातच गावी आल्यावर दहा दिवसांचे क्वारंटाईन, पाच दिवसांचा गणेशोत्सव आणि पुन्हा मुंबईत गेल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यातही एका दिवसासाठी यायचे म्हटले तरी कोरोना चाचणी अत्यावश्यकच आहे. या अटींमुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकमान्यांची अडचण झाली आहे. त्यातही नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गणेशोत्सवासाठी गावी येऊ न शकणाऱ्या पण गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये अशा चाकरमान्यांसाठी हातिस, टेंब्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील बंद घरामध्ये ग्राम कृती दलातर्फे दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी लागणारा खर्च चाकरमानी मुंबईतून गावी पाठवून देणार आहेत. कांचन नागवेकर यांच्या संकल्पनेला चाकरमान्यांनीही प्रतिसाद दिला असून, गावातील ५ कुटुंबियांनी त्याला होकार दर्शविला आहे. त्यामुळे गावी येऊ न शकणाऱ्या चाकरमान्यांच्या घरीही यावर्षी गणेशोत्सव साजरा होणार आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी