शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बामणोलीतील वीरचक्र विजेते हवालदार धोंडू जाधवांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी

By मनोज मुळ्ये | Updated: October 4, 2023 15:42 IST

सचिन मोहिते  देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण ...

सचिन मोहिते देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून लवकरच या स्मारकाला झळाळी मिळणार आहे. तसेच जाधव यांच्या पराक्रमाची गाथा तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.भारत सरकारकडून एखाद्या शूरवीरांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी वीरचक्र मिळणे ही फार मोठी दुर्मिळ बाब आहे. आणि हे अभिमानास्पद असणारे वीरचक्र पदक संगमेश्वर तालुक्यातील ६००-६५० लोकवस्तीच्या असणाऱ्या छोट्या बामणोली गावातील पराक्रमी सैनिक हवालदार कै. धोंडूजी गोविंद जाधव यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले होते. त्यांनी १९४७-४८ साली झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या काश्मीर युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्हि. व्हि गिरी यांच्या शुभ हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्याचबरोबर आदरणीय धोंडूजींना १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.भारत भूमीवर प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या या सुपुत्राचे स्मारक गावामध्ये आहे. यामध्ये हवालदार धोंडूजी जाधव यांचा चौथर्‍यावर बसविलेला अर्ध पुतळा, त्यांच्या पराक्रमाची माहिती आणि पत्र्याची शेड याचा समावेश आहे. स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. दि. २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मारकाच्या सुशोभीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. याची जबाबदारी गावकऱ्यांबरोबरच श्री. भागवत व त्यांच्या समितीने देखील घेतली आहे. यासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतीस्थळ  रत्नागिरी जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्व हुतात्मा झालेल्या जवानांचे दे.शी.प्र. मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये स्मृतीस्थळ उभारणे. पाकिस्तान, चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये रक्षण करताना स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण ४४ पराक्रमी शूरवीर सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्याचे स्मरण व्हावे आणि त्यातून त्यांनी सतत प्रेरणा घ्यावी या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने या सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतिस्थळ संस्थेच्या शहीद जवान स्मारकामध्ये बनविण्याचा संकल्प केला आहे. या स्मृतीस्थळामध्ये संगमरवरी दगडावर कोरलेल्या सर्व हुतात्मा जवानांची नावे, हुद्दा, वीरमरण दिनांक असलेल्या नामपाट्या, आदरांजली वाहण्याकरता संगमरवरी कट्टा, प्रकाश व्यवस्था आदि गोष्टींचा समावेश आहे. याचा अंदाजे खर्च रुपये २ लाख अपेक्षित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी