घोटी : येथील रामरावनगर येथे नवरात्रोत्सवानिमित्त शिवमल्हार मित्रमंडळाच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबवत स्वच्छता मोहीम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घोटी ग्रामपालिकेचे सदस्य संतोष दगडे यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवमल्हार मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण सोनवणे व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन कण्यात आले होते.शिवमल्हार मित्रमंडळ दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविते. मंगळवारी सकाळी जि. प. शाळा येथून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात लहान विद्यार्थ्यांसह महिलांचा सहभाग होता. याप्रसंगी शकूबाई शिंदे, शकुंतला अष्टेकर, मीना अष्टेकर, नानी शेलार, ताई पालवे, माया पालवे, पूनम भागवत यांच्यासह शिवमल्हार मित्रमंडळाचे युवक व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)घोटी येथील शिवमल्हार मित्रमंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविताना महिला, विद्यार्थी व मित्रमंडळाचे कार्यकर्ते.
घोटीत विविध सेवाभावी उपक्रम
By admin | Updated: October 20, 2015 23:05 IST