शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

वायकरांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

By admin | Updated: January 10, 2016 00:37 IST

नीलेश राणे यांचा इशारा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका

 रत्नागिरी : घरपट्टी वसुलीला स्थगिती देण्यात आल्यानंतर वर्षभर ग्रामपंचायतींचे पूर्ण उत्पन्नच ठप्प झाले. गावाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमधील कामेच त्यामुळे ठप्प झाली. त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अनुदान किंवा मदत देता आली असती; पण रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना या प्रश्नाची जाणच नाही. जर हे सत्ताधारी सुधारले नाहीत तर पालकमंत्र्यांची गाडी जिल्ह्यात कोठेही फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी दिला. शुक्रवारी रामपूरचा दौरा आटोपून रत्नागिरीत दाखल झालेल्या राणे यांनी शनिवारी काँग्रेसभुवन येथे पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी पालकमंत्री वायकर यांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. वर्षभर घरपट्टी आकारणे बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. सक्षम अशा ग्रामपंचायतींची संख्या खूपच कमी आहे. घरपट्टीखेरीज कसलेही उत्पन्न नाही, अशा ग्रामपंचायतीच असंख्य आहेत. पण, त्याबाबत सरकारला कोणतेही सोयसुतक नाही. यात सर्वांत मोठा दोष पालकमंत्र्यांचा आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीने त्यासाठी काही ना काही तरतूद करणे गरजेचे होते; पण ज्यांच्या मतदारसंघात झोपडपट्टीच भरपूर आहे, अशा वायकर यांना घरपट्टी आणि झोपडपट्टीतील फरकच कळत नसावा, असा टोला राणे यांनी हाणला. जिल्ह्यातील या प्रलंबित प्रश्नांमुळे जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. (प्रतिनिधी) कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करा रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी ते आपल्या मुंबईतील मतदारसंघाचा आणि कोयनेच्या पाण्याचाच जास्त विचार करतात. त्यामुळे त्यांना कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करावे, असे पत्र आता आपण उद्धव ठाकरे यांना पाठविणार आहोत, असा टोला राणे यांनी मारला. जेव्हा पाहावे तेव्हा वायकर कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याचाच विचार करतात. त्यांना दुसरे काही सुचतच नाही, असेही ते म्हणाले.