शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:55 IST

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

ठळक मुद्देलोकमान्य टिळक स्मारकातील कार्यक्रमसावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

धामणी-संगमेश्वरचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या समाजसुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यानाने उपस्थितांची कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळ संस्मरणीय झाली.या कार्यक्रमाला सावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सहभाग होता. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी परिघाबाहेरचे कार्यक्रम कोणी करत नाही म्हणून आपण करायचे अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रमांमागील भूमिका मांडली.

वाचनालयाने सावरकरांच्या माझे मृत्यूपत्र कवितेतील,की घेतले न हे व्रत अंधतेने ।लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ।

या पंक्तींचे शब्दशिल्प बनवून ते वाचनालयाच्या प्रवेद्वारापाशी लावले आहे. चिपळूणच्या जुन्या पद्मा थिएटर परिसरातील सावरकरांचे भाषण, सभा, स्वागत आणि सत्कार याची आठवणही इंगवले यांनी सांगितली.ज्यांच्या हस्ते काव्यशब्दशिल्पचे अनावरण झाले त्या उन्मेश शिंदे यांचे आजोबा हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि भागोजीशेठ कीर यांचे वर्गमित्र होते. त्यांनी तत्कालिन आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बेहेरे यांनी सन १९५६ साली सावरकर आपल्या घरी आल्याची आठवण सांगताना तेव्हाचा फोटोही जपून ठेवल्याचे सांगितले.श्रीनिवास पेंडसे समाजसुधारक सावरकर या विषयावर बोलताना म्हणाले की, इतिहासात अनेक घटना घडतात. मात्र, इतिहासासकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य अंधारमय होतं. त्यांनी सावरकरांच्या ह्यसहा सोनेरी पानेह्णचा दाखला यावेळी दिला. भेदनीती, वर्णव्यवस्था यामुळे भारत अनेकदा पारतंत्र्यात गेला. सन १९०२ साली वयाच्या १९ व्या वर्षी सावरकरांनी बालविधवा दु:स्थितीकथन कविता लिहिली. सन १९२४ नंतर ते समाजसुधारणेकडे वळले असले तरी त्यांचा लढा तत्पूर्वीपासूनच सुरु होता, असे सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी