शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

दलित वस्ती सुधारणाअंतर्गत पाच तालुक्यांना दोन कोटी

By admin | Updated: August 13, 2014 23:32 IST

रत्नागिरी जिल्हा : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून निधी

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दलित वस्ती सुधारणाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांना दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या योजनेंतर्गत बौद्ध वस्त्यांमधील डांबरीकरण, गटार बांधणे, रंगमंच बांधणे, नळपाणी योजना तयार करणे इत्यादी महत्त्वाची कामे सुचवण्यात आली होती. या कामांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होण्यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतर ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. नीलेश राणे यांच्या पुढील दौऱ्यावेळी या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.दि. १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाला सूचित केलेल्या यादीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील चिपळूण - मिरजोळी कोलेखाजण रस्ता डांबरीकरण करणे, भिले - बौद्धवाडी सभागृह बांधणे, पेढे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, कुडप - बौद्धवाडी समाजमंदिर बांधणे, हडकर्णी - बौद्धवाडी पुलापासून बुध्द विहारापर्यंत रस्ता डांबरीकरण, खेरशेत - बौद्धवाडी सभागृह बांधणे, तळसर मुख्य रस्ता ते मधली बौद्धवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, कोळकेवाडी - बौद्धवाडी सभागृह बांधणे, मांडकी - बौद्धवाडी सभागृह बांधणे, सावर्डे - बौद्धवाडी विहीर बांधणे, आगवे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, टेरव - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, वाशीतर्फ देवरुख भालेकरवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तुळसणी कातकरवाडी बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, कोंड्ये वगडे फाटा ते बौद्धवाडी खंडाळेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण, रत्नागिरी तालुक्यातील विलये - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण करणे, तोणदे - बौद्धवाडी नळपाणी पुरवठा योजना तयार करणे, मावळंगे जाधववाडी गुरववाडी ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, मिरजोळे - बौद्धवाडी ग्रंथालय बांधणे, फणसवळे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, शिवरेवाडी - बौद्धवाडी संरक्षक भिंत बांधणे, शिवरेवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, दांडे आडोम ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, लांजा तालुक्यातील विलवडे - बौद्धवाडी रंगमंच बांधणे, भांबेड - बौद्धवाडी रंगमंच बांधणे, कोंडगे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, आसगे मराठी शाळा ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तळवडे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, जावडे कातळगाव ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, शिपोशी कसाळघर ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, कोट सोमेश्वर मंदिर ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, रिंगणे बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, राजापूर तालुक्यातील जवळेथर पाटीलवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, मिठगवाणे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, पाचल - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, ताम्हाणे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तुळसरे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)