शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

वसतिगृह जागेतील फलक अनधिकृत

By admin | Updated: June 5, 2015 00:21 IST

लवेल येथील प्रकार : चौदागाव धामणदिवी गटातर्फे लावलेल्या फलकावरून वादंग

चिपळूण : लवेल येथे १९६४ साली सिध्दार्थ शिक्षण संस्थेने सुरु केलेल्या बेडेकर यांच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या जागेत चौदागाव धामणदिवी गटातर्फे वसतिगृहाच्या नावाने अनधिकृत फलक लावला आहे. तो काढून टाकण्यासाठी पत्रव्यवहार करुनही प्रशासन चालढकल करीत असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार नारायण तांबे व खेड तालुका बौध्द समाजसेवा संघ शाखा क्र. ८४ लवेलचे अध्यक्ष महेंद्र गमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आंबेडकर वसतिगृहाची इमारत जुनी असून, तीन ते चार वेळा या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या इमारतीसाठी बेडेकर यांनी आपल्या मालकीची १० गुंठे जागा दिली होती. परंतु, आरपीआय खेड तालुकाध्यक्ष शंकर तांबे व माजी शिक्षक जनार्दन गमरे यांनी बेडेकर यांच्याकडून २.७८ गुंठे जागा बक्षीसपत्राने घेऊन उर्वरित जागा विकण्यास परवानगी दिली. त्यामुळे बेडेकर यांनी ही जागा विकली. ही गोष्ट बौध्द समाज सेवा संघ शाखा क्र. ८४ लवेल यांच्या लक्षात आली असता त्यांनी १४ ते १६ एप्रिल २०१२ या कालावधीत वृत्तपत्रात वृत्त प्रसिध्द केले. त्यामुळे ग्रामपंचायत, लवेलने २६ एप्रिल २०१२ रोजी या विषयावर ग्रामसभा बोलावली. त्यामध्ये डॉ. बेडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासाठी लवेल येथे १० गुंठे जागा दिली होती. ती आपण आजही देण्यास तयार असल्याचे कबूल केले व पवार यांच्याकडून ३.२५ गुंठे जागा वसतिगृहासाठी स्थानिक शाखेच्या नावे करुन दिली व उर्वरित जागा शंकर तांबे यांच्या नावे झालेल्या संमतीपत्राची मूळ प्रत मिळताच उर्वरित जागा खरेदीखताने देईन, असे कबूल केले. शंकर तांबे व जनार्दन गमरे यांनी शाखेने खरेदी केलेल्या ३.२५ गुंठे जागेवर आॅक्टोबर २०१२मध्ये उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडे खरेदीखत रद्द करण्यासाठी अपिल केले. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.१ मे २०१५ रोजी चौदागाव धामणदिवी गट संचलित डॉ. बाबसाहेब आंबेडकर वसतिगृह, लवेल असा नामफलक लावण्यात आला. त्यांनी कधीही वसतिगृह चालवले नाही तरी त्यांनी फलक लावला.तांबे व गमरे हे स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेतात. या जागेत इतर समाजातील लोकांना घेऊन तेथे घरे बांधली तरी चालतात. परंतु, शाखेने जागा घेतली, हे त्यांना मान्य झाले नाही. १९६४ पासून १९८३ पर्यंत वसतिगृह चालवित होते व नंतर ते बंद पडले. त्याकडे नंतर समाजाने व चौदागाव धामणदिवी गटाने लक्ष दिले नाही. या वसतिगृहाच्या इमारतीची दोन ते तीन वेळा स्थानिक शाखेने स्वखर्चाने दुरुस्ती केली. असे असताना तेथे अनधिकृत फलक लावून जागा मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व चौदागाव धामणदिवी गट यांनी कंबर कसली आहे. चौदागाव धामणदिवी गटामध्ये चाललेल्या चुकीच्या प्रथेला योग्य वेळी बंधन घालण्यात यावा. ज्या गटाचा संबंध नाही, त्यांनी नामफलक लावून समाजात वाद निर्माण करु नये. हा नामफलक बेकायदेशीर असून, याबाबत ग्रामपंचायत व उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडे पत्रव्यवहार करुनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. ज्यांनी प्रातांकडे दावा दाखल केला आहे ते सुनावणी तारखेच्या वेळी उपस्थित राहात नाहीत. याबाबतही महेंद्र गमरे व नारायण तांबे यांनी खंत व्यक्त केली.लवेल ग्रामपंचायत बौध्दवाडी ग्रामस्थांवर अन्याय करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी संजय गमरे, प्रताप गमरे, उमेश गमरे, नितीन गमरे, राहुल गमरे, विजय गमरे, मनोहर गमरे, अमित तांबे, विशाल गमरे, नीलेश गमरे आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. (प्रतिनिधी)फलक काढण्याची मागणीचौदागाव धामणदिवी येथील गटातील या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. या नव्या वादामुळे शिक्षणक्षेत्र हादरले आहे. वसतिगृहाची स्थानिक शाखेने स्वखर्चाने दुरूस्ती केली. मात्र, त्यानंतर लावलेला फलक अनधिकृत असल्याची माहिती महेंद्र गमरे व नारायण तांबे यांनी दिली.