वसतिगृह जागेतील फलक अनधिकृत

By admin | Published: June 4, 2015 11:27 PM2015-06-04T23:27:38+5:302015-06-05T00:21:07+5:30

लवेल येथील प्रकार : चौदागाव धामणदिवी गटातर्फे लावलेल्या फलकावरून वादंग

Unauthorized panel of hostel premises | वसतिगृह जागेतील फलक अनधिकृत

वसतिगृह जागेतील फलक अनधिकृत

Next

चिपळूण : लवेल येथे १९६४ साली सिध्दार्थ शिक्षण संस्थेने सुरु केलेल्या बेडेकर यांच्या जागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या जागेत चौदागाव धामणदिवी गटातर्फे वसतिगृहाच्या नावाने अनधिकृत फलक लावला आहे. तो काढून टाकण्यासाठी पत्रव्यवहार करुनही प्रशासन चालढकल करीत असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार नारायण तांबे व खेड तालुका बौध्द समाजसेवा संघ शाखा क्र. ८४ लवेलचे अध्यक्ष महेंद्र गमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेडकर वसतिगृहाची इमारत जुनी असून, तीन ते चार वेळा या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या इमारतीसाठी बेडेकर यांनी आपल्या मालकीची १० गुंठे जागा दिली होती. परंतु, आरपीआय खेड तालुकाध्यक्ष शंकर तांबे व माजी शिक्षक जनार्दन गमरे यांनी बेडेकर यांच्याकडून २.७८ गुंठे जागा बक्षीसपत्राने घेऊन उर्वरित जागा विकण्यास परवानगी दिली. त्यामुळे बेडेकर यांनी ही जागा विकली. ही गोष्ट बौध्द समाज सेवा संघ शाखा क्र. ८४ लवेल यांच्या लक्षात आली असता त्यांनी १४ ते १६ एप्रिल २०१२ या कालावधीत वृत्तपत्रात वृत्त प्रसिध्द केले. त्यामुळे ग्रामपंचायत, लवेलने २६ एप्रिल २०१२ रोजी या विषयावर ग्रामसभा बोलावली.
त्यामध्ये डॉ. बेडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासाठी लवेल येथे १० गुंठे जागा दिली होती. ती आपण आजही देण्यास तयार असल्याचे कबूल केले व पवार यांच्याकडून ३.२५ गुंठे जागा वसतिगृहासाठी स्थानिक शाखेच्या नावे करुन दिली व उर्वरित जागा शंकर तांबे यांच्या नावे झालेल्या संमतीपत्राची मूळ प्रत मिळताच उर्वरित जागा खरेदीखताने देईन, असे कबूल केले. शंकर तांबे व जनार्दन गमरे यांनी शाखेने खरेदी केलेल्या ३.२५ गुंठे जागेवर आॅक्टोबर २०१२मध्ये उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडे खरेदीखत रद्द करण्यासाठी अपिल केले. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.
१ मे २०१५ रोजी चौदागाव धामणदिवी गट संचलित डॉ. बाबसाहेब आंबेडकर वसतिगृह, लवेल असा नामफलक लावण्यात आला. त्यांनी कधीही वसतिगृह चालवले नाही तरी त्यांनी फलक लावला.
तांबे व गमरे हे स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेतात. या जागेत इतर समाजातील लोकांना घेऊन तेथे घरे बांधली तरी चालतात. परंतु, शाखेने जागा घेतली, हे त्यांना मान्य झाले नाही. १९६४ पासून १९८३ पर्यंत वसतिगृह चालवित होते व नंतर ते बंद पडले. त्याकडे नंतर समाजाने व चौदागाव धामणदिवी गटाने लक्ष दिले नाही.
या वसतिगृहाच्या इमारतीची दोन ते तीन वेळा स्थानिक शाखेने स्वखर्चाने दुरुस्ती केली. असे असताना तेथे अनधिकृत फलक लावून जागा मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व चौदागाव धामणदिवी गट यांनी कंबर कसली आहे. चौदागाव धामणदिवी गटामध्ये चाललेल्या चुकीच्या प्रथेला योग्य वेळी बंधन घालण्यात यावा. ज्या गटाचा संबंध नाही, त्यांनी नामफलक लावून समाजात वाद निर्माण करु नये. हा नामफलक बेकायदेशीर असून, याबाबत ग्रामपंचायत व उपविभागीय अधिकारी, दापोली यांच्याकडे पत्रव्यवहार करुनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. ज्यांनी प्रातांकडे दावा दाखल केला आहे ते सुनावणी तारखेच्या वेळी उपस्थित राहात नाहीत. याबाबतही महेंद्र गमरे व नारायण तांबे यांनी खंत व्यक्त केली.
लवेल ग्रामपंचायत बौध्दवाडी ग्रामस्थांवर अन्याय करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी संजय गमरे, प्रताप गमरे, उमेश गमरे, नितीन गमरे, राहुल गमरे, विजय गमरे, मनोहर गमरे, अमित तांबे, विशाल गमरे, नीलेश गमरे आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. (प्रतिनिधी)


फलक काढण्याची मागणी
चौदागाव धामणदिवी येथील गटातील या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. या नव्या वादामुळे शिक्षणक्षेत्र हादरले आहे. वसतिगृहाची स्थानिक शाखेने स्वखर्चाने दुरूस्ती केली. मात्र, त्यानंतर लावलेला फलक अनधिकृत असल्याची माहिती महेंद्र गमरे व नारायण तांबे यांनी दिली.

Web Title: Unauthorized panel of hostel premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.