शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उभारणार उद्योग भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथील गाव समितीच्या महिलांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. विविध बचत गटांच्या माध्यमातून ...

चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथील गाव समितीच्या महिलांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. विविध बचत गटांच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे पाहून त्यांनी या महिलांचे कौतुक केले आणि त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी गावातच उद्योग भवन इमारत उभारून देण्याचे आश्वासनही दिले.

कापसाळ गावामध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत जिल्हा परिषद शाळेची एक इमारत होती. परंतु, पटसंख्येअभावी ती शाळा बंद पडली आणि सध्या ही जागा मोकळी आहे. त्या ठिकाणी गावातील बचतगट, ग्रामसंघ यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या महिलांना हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध व्हावे, अशा प्रकारचे उद्योग भवन उभारून द्यावे, या मागणीसाठी गावातील एकता महिला गाव समितीच्या महिलांनी नुकतीच जाधव यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार जाधव यांनी या महिलांशी संवाद साधला.

गावात ५३ बचत गटांच्या माध्यमातून ४००हून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करताना, आपण एक चांगली मागणी घेऊन माझ्याकडे आला आहात. आपल्या सर्वांमध्ये निर्माण झालेल्या उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन आपल्याला अधिक सक्षम बनवणे, हे आमदार म्हणून माझे कर्तव्यच आहे, असे सांगून कितीही अडचणी आल्या, तरी त्यावर मार्ग काढेन व उपलब्ध असलेल्या जागी उद्योग भवन इमारत उभी करून देईन, असा शब्द त्यांनी समितीच्या महिलांना दिला. यावेळी एकता महिला गाव समितीच्या अध्यक्ष स्वाती साळवी, उपाध्यक्ष मंजूषा साळवी, सचिव भूमी खेडेकर यांच्यासह समितीच्या सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.