शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे उद्या तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:12 IST

जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देसागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे उद्या तांडवपाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट

रत्नागिरी : जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.गेल्या ४ दशकांच्या काळात मिऱ्या गावाच्या सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. प्रतिबंधासाठी दगडी बंधारावजा भिंत उभारण्यात आली. परंतु ती योग्य निकष न पाळल्याने सातत्याने कोसळत आहे.

करोडो रुपये या धूपबंधाऱ्यावर खर्च करण्यात आले आहेत. तरीही मिऱ्या गावाला सागरापासून असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे आता मिऱ्यामध्ये टेट्रापॉड धर्तीवरील धूपप्रतिबंधक बंधारा उभारला जाणार आहे. मात्र, हा बंधारा पावसाळ्यात उभारला जाऊ शकत नाही. त्यामुळे तातडीची दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्यासाठीही संबंधित विभागाकडे पैसेच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती झाली नाही.

आता गुरुवारी रत्नागिरीत सागराला दुपारी १२.३७ वाजता उधाणाची भरती येणार आहे. पावसाळ्यातील या उधाणाच्या भरतीच्या वेळी जोरदार वाऱ्यांमुळे उंच लाटा मिऱ्या किनाऱ्यावर धडकण्याची भीती आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गRatnagiriरत्नागिरी