शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्रात परीक्षेला बोगस विद्यार्थी बसविण्याचा प्रकार

By मेहरून नाकाडे | Updated: June 11, 2024 16:39 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाव्दारे रत्नागिरीत सुरू असलेल्या काैशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे  कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम ...

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाव्दारे रत्नागिरीत सुरू असलेल्या काैशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे  कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरू आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावटी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बोगस विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थ्याना बसविण्यात येते त्यासाठी बोगस आधारकार्ड, कागदपत्रे बनविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दि.२५ मे २०२३ साली या काैशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. या केंद्राला दि. २५ मे २०२४ साली वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात ६०० विद्यार्थी प्रशिक्षित होवून बाहेर पडले असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले तर किती बोगस विद्यार्थी होते हा प्रश्न अनुत्तरीत आहे.शहरातील हाॅटेल व्यावसायिकांकडेही केंद्रातर्फे संपर्क साधून अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सेमी प्रशिक्षित करण्यासाठी नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हाॅटेल व्यावसायिकांनीही कर्मचाऱ्यांची नावनोंदणी करून आधारकार्ड जमा केली होती. संबंधित हाॅटेल व्यावसायिकांनी नोंदणी केलेल्या एकाही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेलेले नसल्याचे सांगण्यात आले. तर या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असल्याचे समजते.आधारकार्ड बनावटअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असलेली एक विद्यार्थिनी या केंद्राची माजी विद्यार्थिनी राहिली आहे. तिला बोलावून बनावट आधारकार्ड व नावावर परीक्षा देण्याचे सांगण्यात आले, त्यावेळी तिने धाडस दाखवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. अनेक विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे फोटो घेवून बनावट नावाची आधारकार्ड तयार करून त्यांना परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घोटाळ्यात फार मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. एका विद्यार्थ्यामागे काैशल्य विकास केंद्राला शासनाकडून पैसा येतो. शासनाकडून येणारा भरमसाठ निधी उकळण्याचा प्रकार असून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षा