शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

बालकासह दुचाकी चोरटे रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:54 IST

त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देरात्री नाचणे रोडवर दोन संशयास्पद मोटारसायकल व चारजण दिसले.

रत्नागिरी : शहरातील दुचाकी चोऱ्यांचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. मंगळवारी रात्री गस्तीच्यावेळी नाचणे रोड येथे संशयितरित्या फिरणाऱ्या  चौघांची चौकशी केली असता, दुचाकी चोऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. एका विधीसंघर्षित बालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले.रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे तसेच घरफोडी, दुकानफोडीचे प्रकार वाढले आहेत.  हे प्रकार रोखण्यासाठी व गुन्हे उघडकीला आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांना मार्गदर्शन केले होते.पोलिसांनी ताब्यात  घेतलेल्या आरोपींमध्ये यश राजकुमार शर्मा (१९, रा. घुडेवठार, रत्नागिरी), सुरज सुरेश सकपाळ, (१९, रा. तेली आळी, रत्नागिरी), विघ्नेश देंवेद्र भाटकर (१९, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी) व एक विधीसंघर्षित बालक अशा एकूण चारजणांचा समावेश आहे.या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पांडुरंग गोरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, सुभाष भागणे, मिलिंद कदम, संजय जाधव, पोलीस नाईक अमोल भोसले, उत्तम सासवे, अरुण चाळके, गुरुनाथ महाडिक, विजय आंबेकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, सागर साळवी, रमिझ शेख, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला.चोरीची कबुलीरत्नागिरी शहर परिसरामध्ये गस्त घालण्याचे काम सुरु होते. २६ नोव्हेंबर रोजी रात्री नाचणे रोडवर दोन संशयास्पद मोटारसायकल व चारजण दिसले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, रत्नागिरी शहर परिसरामधून दुचाकींची व सायकलची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.मुद्देमाल हस्तगतत्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर