शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयात रिक्त पदे, राज्य सरकारला दिली दोन आठवड्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:33 IST

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती घेऊन सरकारचे म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयात रिक्त पदे, राज्य सरकारला दिली दोन आठवड्यांची मुदतमुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती घेऊन सरकारचे म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि इतर आरोग्य यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात रत्नागिरीतील खलील वस्ता यांनी अ‍ॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती ए. ए. सय्यद तसेच न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याचिकेची सुनावणी झाली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तसेच इतर आरोग्य यंत्रणेतील पदाबाबत युक्तिवाद करण्यात आला.

याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात माहिती घेऊन सरकारचे म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी मागणी केली. पुढील तारखेपर्यंत सरकार पक्षातर्फे ठोस पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा न्यायालयासमोर व्यक्त केली.सरकारला हवी मुदतरत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय व इतर वैद्यकीय रुग्णालयांबाबत विचारणा केली असता सरकारी पक्षातर्फे याबाबत माहिती घेण्यासाठी पुढील तारखेची विनंती केली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी