शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:43 IST

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

गोव्यातील गिब्स या ट्रॅव्हलर कंपनीची खासगी आरामबस (जीए ०३ - एन ४७०४) शुक्रवारी सायंकाळी गोव्याहून मुंबईकडे निघाली. सुरूवातीला बसमध्ये कमी प्रवासी होते. त्यानंतर म्हापसा, झाराप, कणकवली, पणदुर, मालवण, कट्टा आदी ठिकाणचे प्रवासी बसमध्ये चढले होते. एकूण ३२ प्रवासी त्या बसमधून प्रवास करीत होते. रात्री दहाच्या दरम्यान वाटुळ घाटीतील एका अवघड वळणार बसचालक राजेश कांबळे याचा ताबा सुटला व बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळली व मार्गावरच कलंडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या धडकेने ऐनाचे झाड मोडून पडले. प्रवाशांमध्ये खूप मोठा आरडाओरडा सुरू झाला.

बसला अपघात झाल्याची खबर ओणी - पाचल फाट्यावर उभारण्यात आलेल्या पोलीस पथकाला मिळताच काही मिनिटातच तेथील वर्दीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आपल्या सहकाºयांसह वाटुळ घाटात पोहोचल्या.वाटुळ व परिसरातील अनेक स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले.

या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळेली - कुडाळमधील शिवराम यशवंत परब (४९) जागीच ठार झाले होते. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. बसखाली अडकल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. नंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले होते. त्यातील काहींची अवस्था नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लांजा तसेच रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे उपचार सुरु असताना रेश्मा रमाकांत पंडीत (५६, परळ पूर्व, मुंबई) यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती रमाकांत पर्शुराम पंडीत हेही त्याच बसमधून प्रवास करीत होते. तेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत.अपघातातील जखमी प्रवाशांना ओणीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासह राजापूर, लांजा व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या अपघातानंतर उपविभागाचे पोलीस अधिकारी मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल जाधव, साळुंखे, पोलीस नाईक प्रकाश झोरे, योगेश तेंडुलकर, अतुल ठाकुर, युवराज सूर्यवंशी, नीलेश जाधव, योगेश भाताडे, महामार्गचे सहाय्यक उपनिरीक्षक हलगी, साळुंखे आरटीओचे अधिकारी आदी घटनास्थळी उपस्थित होते.

महामार्ग लवकर मोकळा

या अपघातानंतर महामार्ग पोलीसांसह खास गणपती सणासाठी महामार्गावर उभारलेल्या पथकांमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. महामार्गावर असलेली क्रेन मागवून अपघातग्रस्त बस हलवण्यात आली. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल जखमीबाबनाथ विठोबा गोसावी (४७), प्रिया रवींद्र गावडे (४६), अपर्णा शिवाजी परब (५५), दीपा बाबनाथ गोसावी, देवांग सतीश झारापकर (१६), राजेश बापू कांबळे (४७, बसचालक), प्रथमेश शिवाजी परब (२५), रवींद्र सावळाराम गावडे (४८), सौ. प्रिया रवींद्र गावडे (३५), अ. ना. उजगावकर (३४), सौ. रश्मी राजन देसाई (४८), अपर्णा बबन सावंत (३०), मंगेश वसंत चारी (२९), विजयालक्ष्मी बाबाजी सावंत देसाई (४८), रामचंद्र बापू चव्हाण (६५), राजेश बापुराव गोसावी (४८), योगेश हरिश्चंद्र सावंत (२५)रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलेले जखमीरमाकांत पर्शुराम पंडीत (६२), उदय बापू परब (३६), रुपेश रघुवीर पाष्टे (३४), सचिन रघुवीर पाष्टे (३२), शिरीष चंद्रकांत सावंत (३०), रुचिता चंद्रकांत सावंत (६२), त्रिमूर्ती राजाराम सावंत (५१), अक्षय त्रिमूर्ती सावंत (२४), साबाजी राघोबा देसाई (२४), ओमकार साबाजी देसाई (२४), रवींद्र मनोहर परब (४९), रविना रवींद्र परब (४५), स्नेहा रवींद्र परब (१४)