शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

अडीच लाख मतदार देणार कौल

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज

चिपळूण : विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचाराची रणधुमाळी संपली असून, आता प्रत्यक्ष मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात अडीच लाख मतदार उद्या आपला कौल देतील. हा मतदारसंघ चिपळूण व संगमेश्वर या दोन मतदारसंघात विभागला गेला आहे. २६५ चिपळूण - संगमेश्वर मतदार संघात एकूण २३५ गावे असून, ३१८ मतदान केंद्र आहेत. प्रत्यक्षात संगमेश्वर तालुक्यातील गोठणे या पुनर्वसित गावात मतदान होणार नसल्याने तेथील मतदार हातीव केंद्रावर मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ३१७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील २० मतदानकेंद्र संवेदनशील आहेत. ३१७ मतदानयंत्र आज (मंगळवारी) संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत. आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांनी तिसरे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. ३२ मतदानयंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. गुरुदक्षिणा सभागृहातील ३७ खोल्यांमधून साहित्य देण्यात आले. त्यासाठी ३९ एस. टी. बसेस, २४ शासकीय वाहने, ३६ खासगी वाहने दिमतीला होती. उद्या (दि. १५) मतदान संपल्यानंतर रात्री पुन्हा सर्व यंत्र गुरुदक्षिणा सभागृहात आणण्यात येतील. दि. १९ रोजी १४ टेबलांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. २३ फेऱ्यांत ही मोजणी होईल. प्रत्यक्ष मतदानापूर्वी चाचणी होणार आहे. चिपळूण तालुक्यातील ९१, तर संगमेश्वर तालुक्यातील १४४ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. चिपळूण मतदार संघात १५७, तर देवरुख मतदार संघात १६१ मतदान केंद्र आहेत. या मतदार संघात चिपळूण तालुक्यातील ६७ हजार ५२६ पुरुष, तर ६६ हजार ८०८ महिला मतदार मिळून १ लाख ३४ हजार ३३४ मतदार आहेत. संगमेश्वर तालुक्यात ५४ हजार ५९४ पुरुष, तर ६० हजार ७९५ महिला मतदार मिळून एकूण १ लाख १५ हजार ३८९ मतदार आहेत. दोन्ही मिळून या मतदार संघात २ लाख ४९ हजार ७२३ मतदार आहेत. मतदार संघात ५ हजार ४८३ महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील निकालावर महिलांचे वर्चस्व राहणार आहे. चिपळूण - संगमेश्वर मतदार संघातील ४४ मतदान केंद्र शहरी भागात आहेत. २७४ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. या मतदार संघात ४३० झोनल आॅफिसर, सहाय्यक झोनल आॅफिसर व प्रिसायडिंग आॅफिसर कार्यरत आहेत. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची फिरती पथकेही आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभतेने हाताळली जाणार आहे. (प्रतिनिधी)चिपळूणएकूण मतदार २,४९,७२३चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवारनाव पक्ष  शेखर निकमराष्ट्रवादी--सदानंद चव्हाणशिवसेना--सुशांत जाधवरिपाइं --प्रेमदास गमरेबसपा--माधव गवळीभाजपयशवंत तांबेरिपाइं--गोपीनाथ झेपलेअपक्ष--उमेश पवारबहुजन मु. पार्टी--संतोष गुरवअपक्ष--रश्मी कदमकाँग्रेस२ लाख ४९ हजार ७२३ मतदार करणार उद्या मतदान.मतदारसंघात चिपळूणमधील ९१, तर संगमेश्वरमधील १४४ गावांचा समावेश.प्रशासकीय यंत्रणा सज्ज.२३ फेऱ्यात होणार मतमोजणी.मतदानापूर्वी घेतली जाणार मतदानयंत्रांची चाचणी.मतदानाच्या दिवशी फिरती पथके घालणार गस्त.अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज.

लांजात ३३२ मतदान केंद्रांवर ११२८ कर्मचाऱ्यांची नियुक्तीखेड तालुक्यात १४ मतदान केंद्र संवेदनशील