शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कासवाची पिल्ले समुद्राकडे झेपावली

By admin | Updated: February 2, 2016 23:20 IST

राजापूर तालुक्यातील पहिलीच घटना : वन विभागाने केले संरक्षण

रत्नागिरी : माडबन (ता. राजापूर) येथील समुद्रकिनारी वन विभागाने ५५ दिवस संरक्षित केलेल्या कासवांच्या ७५ पिलांना सोमवारी किनाऱ्यावर सोडले. काही वेळातच ही पिल्ले सागराच्या दिशेने झेपावली. माडबन सागर किनारी ९ डिसेंबर २०१४ रोजी वन विभागाला कासवांची १२४ अंडी आढळली. विभागाने संरक्षक रचना करून वाळूमध्ये खड्डा केला व अंड्यांना त्यात सुरक्षित ठेवले. अंड्यातून पिल्लेबाहेर येण्याच्या कालावधीत या भागातील काही ठिकाणची वाळू हलकी होऊन छोटे छोटे खड्डे निर्माण झाले. त्यामुळे पिल्लेबाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे लक्षात येताच वन विभागाने या ठिकाणी श्वान, कोल्हे या प्राण्यांपासून या पिलांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर टोपले ठेवले. त्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामस्थ तसेच इतर सरकारी यंत्रणांचेही लक्ष होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राजापूर वन विभागाला पिल्ले अंड्यातून बाहेर आल्याचा फोन आला. ताबडतोब विभागीय वन अधिकारी विजय जगताप आणि रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी आणि इतर कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. त्याचबरोबर माडबनचे पोलीसपाटील शामसुंदर गवाणकर, सरपंच योगेश वाघधरे, ग्रामसेवक वर्षा राणे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाच्या आधी या पिलांना समुद्रात सोडणे गरजेचे होते. संरक्षित केलेल्या ठिकाणी आज ७५ पिल्लेआढळली. या पिलांना समुद्राकडे वळवण्यात आले. थोड्याच वेळात ही पिल्लेसागराकडे झेपावू लागली. यावेळी साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अवर्णनीय असा आनंद दिसून येत होता. कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्याची राजापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)