शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण

By मेहरून नाकाडे | Updated: September 6, 2022 12:27 IST

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथील हातीसकर बंधू यांनी विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढली.

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करीत असतानाच बसणी येथील हातीसकर बंधू यांनी गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढून समस्त भाविकांचे लक्ष वेधून तर घेतले शिवाय एकात्मतेचा संदेशही दिला.रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील हातीसकर बंधू दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. नोकरी-व्यवसायानिमित्त रत्नागिरी, मुंबई येथे वास्तव्यास असले तरी गणेशोत्सवासाठी मूळ घरी एकत्र येतात. स्वतंत्र गणेशोत्सव साजरा न करता ७० जणांचे कुटूंब एकत्रित सण साजरा करतात.भाद्रपद चतुर्थीला गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमात सर्व बालगोपाळ सहभागी होतात. गौरीगणपती विसर्जनालाच हातीसकर बंधूंच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होते. दरवर्षी नवीन संकल्पनेतून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. दोन वर्ष कोरोना संकटामुळे शक्य झाले नव्हते. मात्र यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीच्या सुरूवातीला कमांडो नंतर भारताच्या नकाशासमोर भारतमाता तिरंगा घेवून त्यामागे तिरंगा घेवून युवक व त्यामागे गणेशमूर्ती व हातीसकर कुटूंबातील काही सदस्य सहभागी झाल्याने निघालेली भव्य तिरंगा मिरवणूक आकर्षण ठरली होती. भारतमातेवरील प्रेम व त्यातून एकात्मतेचा संदेश हातीसकर कुटूंबियांनी गणेशोत्सव मिरवणूकीतून दिला. ७० सदस्यांनी या मिरवणूकीत सहभागी होत, एकत्र कुटूंब पध्दतीचेही दर्शन घडविले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव