शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

पोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 16:51 IST

पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देपोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजलीरत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर श्रद्धांजली

रत्नागिरी : पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर दिनांक २१ आॅक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राणार्पण केले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येतो.भारतामध्ये दिनांक १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीत एकूण २९२ पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी व जवानांनी कर्तव्य बजावत असताना प्राणार्पण केले.

कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेल्या देशातील सर्व हुतात्म्यांना दिनांक २१ आॅक्टोबर २०१९ रोजी पोलीस मुख्यालय परेड मैदानावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.या श्रध्दांजली कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) अय्युब खान, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक अनिल लाड, राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांचेसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानRatnagiriरत्नागिरी