शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखात मुदत संपलेल्या औषधांचा ढीग, मेडिकलमधील साठा असण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:37 IST

देवरूख शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे येथील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात संतापले असून, ही बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे.

ठळक मुद्देऔषध विक्री करणारा डिलर किंवा मेडिकलमधील साठा असण्याचा अंदाजकालबाह्य झालेली औषधे विषच, परिणाम गंभीर नगरपंचायतीने औषधसाठाची विल्हेवाट लावण्याची मागणी

देवरूख : शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे येथील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात संतापले असून, ही बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे.मुदत संपलेली औषधे म्हणजे एक प्रकारे विषच मानले जाते. अशा मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्याची एक कार्यपध्दती आहे. ती न अवलंबल्यास ही औषधे किमान नगरपंचायतीच्या ताब्यात कचरा म्हणून देणे गरजेचे होते. हे सर्व नियम धाब्यावर बसवून अज्ञाताने सुमारे १ टेम्पो भरेल एवढा मुदत संपलेल्या औषधांचा ढीग केला आहे. झाडांच्या आडोशाला हा औषधसाठा टाकून अज्ञाताने पळ काढला आहे.भरवस्तीशेजारीच ही शांत जागा बघून कोणालाही न कळू देता अज्ञाताने ही औषधे टाकली आहेत. या औषधांमध्ये विविध आजारांवरील गोळ्या, विविध प्रकारची बाटल्यांमधील पातळ औषधे, इंजक्शनसाठी वापरण्यात येणारी सिरीन, कापूस व अन्य प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. बुधवारी सकाळी येथील नागरिकांना हा ढीग दिसून आला. यातील काही औषधांची तपासणी केली. यात मुदत संपलेलीच औषधे टाकल्याचे दिसून आले. यामुळे येथील नागरिकांमधून चीड व्यक्त केली जात आहे.हा कचरा तत्काळ उचलला जावा, अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे नागरिक करणार आहेत. तसेच याबाबतचे निवेदन देवरूख पोलीस ठाण्यालाही देण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे. या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. टाकलेला माल हा लाखो रूपयांचा आहे. मात्र, आज त्याची किंमत नसल्याचे नागारिक बोलत आहेत.औषधसाठा कोणाचा?बेवारस टाकलेली ही औषधे औषधविक्री करणारा डिलर अथवा मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्याचीच असावीत, असा अंदाज तेथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, या वस्तीच्या जवळ असे कोणतेही औषध विक्रेते नसल्याने देवरूख मुख्य बाजारपेठेतूनच हा औषधी कचरा टाकल्याचे बोलले जात आहे.

मुदत संपलेली औषधे उनाड जनावरांच्या अथवा या परिसरात खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या हाती लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. येथील नागरिकांनी खबरदारी म्हणून नगरपंचायतीला कळविले आहे.

टॅग्स :medicinesऔषधंRatnagiriरत्नागिरी