दस्तुरी : खेड तालुक्यातील ग्रामपंचायत, चिंचघर व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून गावातील रस्त्यालगत व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
जंगलतोड व अन्य कारणांमुळे झाडांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शासनाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून चिंचघर गावात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमावेळी चिंचघरचे ग्रामपंचायत सदस्य सखाराम जाधव, संदीप सावंत, प्रदोश कडू, अविनाश जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
खेड तालुक्यातील चिंचघर गावाच्या परिसरात माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.