शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

कचरा डेपो इचलकरंजीचा; त्रास मात्र ग्रामीण भागाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 23:49 IST

जनआंदोलन लोकप्रतिनिधींकडून बेदखल : यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगरचा भाग बाधित--कचऱ्याने केला कचरा

घन:शाम कुंभार -- यड्राव--इचलकरंजी शहरातील सर्व कचरा गोळा करून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कचरा डेपोत आणून टाकला जातो. प्रत्येक दिवशी चाळीस ट्रॅक्टरमधून ८० फेऱ्यांत सुमारे १२० मेट्रिक टन कचरा याठिकाणी येऊन पडतो. हा कचरा वाऱ्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरतो. कचरा इचलकरंजीचा, परंतु त्रास यड्राव, टाकवडे, शहापूर व सांगली नाका परिसराला सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांनाच वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले, परंतु याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.कचरा डेपोच्या पूर्वेस टाकवडे गावची हद्द आहे. उत्तरेस यड्रावचा परिसर, पश्चिमेस शहापूर व सांगली नाका व दक्षिणेस आसरानगर, सहकारनगर हा इचलकरंजीचा परिसर आहे. या कचरा डेपोत चाळीस ट्रॅक्टर-ट्रॉलीने दोन-दोन फेऱ्या कचरा भरून आणून टाकतात. प्रत्येक खेपेस सुमारे टन-दीड टन कचरा या ट्रॉलीत मावतो. असा एकूण सुमारे १२० टन दररोज संपूर्ण शहरातील कचरा गोळा होतो.कचरा शहरातून वाहून आणताना बऱ्याच ट्रॉलीवर ताडपत्री किंवा झाकण नसल्याने भरधाव ट्रॉलीतून हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावरच पडतो. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरते. तसाच उर्वरित कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. रॅक्टर-ट्रॉलीचालकांना फक्त खेपेची काळजी असते. कचरा कोठे पडतो, याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. डेपोतील कचरा वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात उडून यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगर, सांगली नाका, आसरानगर परिसरात उडून जातो. तेथील नागरिक, रहिवासी व शेतकऱ्यांना हा कचरा गोळा करून बाजूला फेकण्याचा उपद्व्याप सहन करावा लागत आहे.या कचऱ्याच्या त्रासाला वैतागून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने आंदोलनासाठी रस्त्यावर यावे लागले आहे, परंतु याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांच्या समस्याही कचरा डेपोतील कचऱ्यासारख्या साठून वाढत आहे. तरीही याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहात नाही. इचलकरंजीच्या कचरा डेपोचा आणखी किती त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर अवलंबून आहे. कचरा डेपोत रस्त्यामध्येच ट्रॉलीतून कचरा उतरण्यात येतो. दुसऱ्या छायाचित्रात कचरा डेपोतील वाऱ्याने उडून आलेला कचरा गोळा करून टाकताना यड्राव हद्दीतील शेतकरी.कचरा डेपो इचलकरंजीचा व त्रास आम्हाला, हा अन्याय सहन करणार नाही. नगरपालिकेने याबाबत खबरदारी घ्यावी; अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. --- रोहित कदम, ग्रा. पं. सदस्य, यड्राव कचरा बाहेरच पडत असल्याने दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचा बंदोबस्त करावा व तत्काळ कचरा डेपो हलवावा. =- शेखर हळदकर, ‘इनपा’चे शिक्षण समिती सदस्य