शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असूनही आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक, पोलीस बंदोबस्ताबाबत प्रश्न चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 14:08 IST

साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही अवजड वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

साखरपा : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातून अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही बुधवारी तीन वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.२२ जुलै २०२१रोजी झालेल्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळून महामार्ग चौदा दिवस बंद होता. महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. चारचाकी वाहनांना आंबा घाटातून वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. तब्बल अडीच ते तीन महिन्यांनी सहाचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली. अद्याप या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अवजड वाहनांची वाहतूकही सुरू झाल्याचे दिसत आहे.गेले आठ दिवसात अशी वाहने मुर्शी तपासणी नाक्यावरून जात आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ही अवजड वाहने धावत आहेत. वाहने जाण्याच्या वेळेतच पोलीस अन्यत्र जात असल्याने वाहनांची तपासणी होत नसल्याचे दिसत आहे. वाहनांची येण्याची वेळ आणि पोलीस नसण्याची वेळ योग्य साधली जात असल्याने यामागचे गौडबंगाल काय आहे, याचा तपास घेण्याची मागणी होत आहे. या वाहनांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी