शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

रस्ता फोडल्याने वाहतूक बंद

By admin | Updated: July 2, 2016 23:43 IST

खेड नगर परिषद : पाच-सहा दिवसात काम होणार पूर्ण

खेड : नगर परिषद हद्दीतील जगबुडी नदीकिनाऱ्यालगत असलेला वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. खेड नगरपालिकेने हा रस्ता फोडला असून, शहरांतर्गत असलेला हा महत्वाचा रस्ता मध्यभागी तुटल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. नगर परिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता, ५ ते ६ दिवसांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर काँग्रेसचे गौस खतिब यांनी मात्र तातडीने रस्ता पूर्ववत न झाल्यास आंदोलन करू, असा गर्भित इशाराच दिला आहे़ मुख्याधिकारी रोडगे यांच्या म्हणण्यानुसार, बोरज धरणातून खेडवासीयांना पिण्याची पाईपलाईन याच रस्त्याच्यामधून आली आहे. या लाईनचा एक पाईप खराब व निकृष्ट झाल्याने तो बदलण्यासाठी हा रस्ता फोडावा लागला आहे. रस्त्याचे दोन भाग झाले आहेत. मात्र, येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये हा रस्ता पूर्ववत करणार असल्याचे सांगत नागरिकांची गैरसोय होऊ देणार नसल्याचे सांगितले. गेल्या १० दिवसांपूर्वी हा रस्ता फोडण्यात आला आहे. नगर परिषदेने हा रस्ता का फोडला? यामागचे कारण कोणालाही माहीत नव्हते. या रस्त्यावरील वाहतूक आणि रहदारी बंद झाली आहे. ब्रिटिशकालीन खेड बंदर म्हणून खेडची जुनी ओळख आहे. याच ठिकाणी हे बंदर अस्तित्वात होते. आजही खेडची ओळख खेड बंदरामुळे झाल्याचे अनेक नागरिक सांगतात. जगबुडी नदीकिनारी असलेले हे बंदर सर्वप्रकारे हिताचे आहे. बंदर असल्याने तत्कालीन सरकारने या ठिकाणी रस्ता तयार केला होता. त्याचे अनेकवेळा डांबरीकरणही करण्यात आले. आजही हा रस्ता शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वपूर्ण मानला जात आहे. उन्हाळयात या ठिकाणाहून पलिकडील भोस्ते गावात जाता येते. त्यामुळे या रस्त्याचा वापर होतो. शिवाय या परिसरात मुस्लिमवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि येथूनच शहरातील विविध भागात जाणे-येणे शक्य होत असल्याने या मार्गाचा मोठ्या प्रमाणात रहदारीसाठी वापर होत आहे. (प्रतिनिधी) वाहनांची वर्दळ थंडावली साठे मोहल्ला, पोत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला येथील अंतर्गत वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. आता हा मार्गच बंद झाल्याने नागरिक आणि वाहनांची वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे. ही वाहतूक आता अनिश्चित काळासाठी बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.