शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:13 IST

सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले हॉटेल्स, लॉज १० जूनपर्यंत फुल्ल, रेल्वे, बसगाड्यांनाही गर्दी

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोकणात हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढतो. विद्यार्थीवर्गाला दिवाळीची सुटी तशी फारशी नसते. मात्र, उन्हाळी सुटी महिना, दीड महिना असल्याने या कालावधीत बहुतांश लोक कुटुंबासह पर्यटनाला निघतात.ह्यमार्च एंडिंगह्णच्या धावपळीतून बाहेर पडलेला नोकरदारवर्गही रिलॅक्स होण्यासाठी आठ - दहा दिवसांची सुटी काढून फिरायला बाहेर पडतो. कोकणातील समुद्र किनारे आणि वनराजी पर्यटकांना हापूस आंब्याच्या ओढीने बहुतांश पर्यटक या कालावधीत कोकणात येतात.सध्या मे महिना सुरु असल्याने रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. रत्नागिरीतील भगवतीबंदर, भाट्ये, मांडवी किनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी, आरे-वारे किनारा, गणपतीपुळे, मुरूड - दापोली, गुहागर, वेळणेश्वर आदी पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्स, लॉज सध्या पर्यटकांनी भरलेली आहेत. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते.या कालावधीत एस. टी. गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडूनही त्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीचा हंगाम पाहता सध्या एस. टी.तून मुंबई प्रवास ४५० रूपयांत होत असताना खासगी गाड्यांना नॉन एसीसाठी ७०० ते ८००, तर एसी गाड्यांना ९०० ते ११००पर्यंत भाडे मोजावे लागत आहे.गेल्या काही वर्षात रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा हा हंगाम अगदी १० ते १५ जूनपर्यंत राहील, असे मत हॉटेल व्यावसायिक तसेच लॉजधारकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

 

दरवर्षी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. याहीवर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आताच लॉजचे ८५ टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी ८ ते १० जूनपर्यंतचे आरक्षणही आतापासूनच फुल्ल झाले आहे.- दीपक साळवी,हॉटेल ग्रार्इंड इन, रत्नागिरी.

 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी