शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri, Tiware Dam Breached: तिवरे धरणं फुटलं; काल रात्री नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:28 IST

परिसरात भीतीचं वातावरण; बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं. यामुळे 24 जण वाहून गेले. सकाळी 10 पर्यंत सहाजणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर इतरांचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे. धरण फुटल्यानं परिसरातील 13 घरं वाहून गेली. यामुळे या भागात सध्या भीतीचं वातावरण आहे. तिवरे धरण परिसरात नेमकं काय घडलं?गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातही वरुणराजा तुफान बरसत आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं चिपळूणमधील तिवरे धरण काल रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. त्यानंतर ते ओव्हरफ्लो झालं. थोड्याच वेळात धरणाला भगदाड पडलं आणि परिसरात खळबळ माजली. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली.जोरदार पाऊस झाल्यास धरण फुटू शकतं, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दलची तक्रार पाटबंधारे विभागाकडेदेखील केली होती. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. धरणाचं ओव्हरफ्लो होणारं पाणी वशिष्ठीच्या खाडीला आणि शास्त्री नदीला जाऊन मिळत असल्यानं धरणाला धोका नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. स्थानिकांनी व्यक्त केलेली भीती काल रात्री खरी ठरली. धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.  

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण