शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा

By admin | Updated: June 9, 2015 01:00 IST

असंख्य त्रुटी : भिंगळोलीतील महावितरण उपकेंद्राचा दूरध्वनी बंदच

मंडणगड : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीचा सामना करता यावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्यासाठी बीएसएनल व महावितरणसह अनेक सर्वच खात्यांनी मे महिना तयारीच्या पूर्वनियोजनासाठी घालविला आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या भिंगळोली येथील सबस्टेशनचा दूरध्वनी गेली पंधरा दिवस बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी संपर्क साधायचा झाल्यास दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटसह मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावली. तालुक्यातील पालघर येथील डी. पी.वर सुमारे अर्धा तास स्पार्किंग सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी सबस्टेशनवर फोन केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पावसाच्या दिवसात तारा तुटणे व स्पार्किंगसारख्या घटना वारंवार घडत असतात. काही वेळा अपघातही होतात. त्यासाठी महावितरणचे स्थानिक व्यवस्थापन नेहमीच सज्ज असते. पावसाळ्यात आपत्ती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने महावितरणच्या सज्जतेची अद्याप परीक्षा झालेली नाही. ओ. एफ़ सी. केबलद्वारे ग्रामपंचायती इंटनेटनच्या माध्यमातून जगाशी जोडण्याच्या नादात बीएसएनएल कंपनीची दमछाक होत आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत पहिली अंमलबजावणी मंडणगड तालुक्यात झाली, ही अभिमानास्पाद बाब असली तरी काम पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील एकेरी रस्त्यांच्या बाजूने ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात लँडलाईन व मोबाईल अनेक वेळा दीर्घ कालावाधीसाठी संपर्कक्षेत्राबाहेर जातात. आपत्तीसाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कसोटीचा काळ पावसानंतर सुरु होणार आहे. सध्या तरी नागरिकांना विविध कारणांनी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)मंडणगड तालुक्यात अपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रसासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही यंत्रणा सज्जतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच संपर्काचे प्रमुख साधन असलेले बीएसएनएल मात्र संदीग्ध वातावरणातच आहे. त्या कारभारात सुधारणा कधी होणार .