शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवसरमध्ये विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:28 IST

लांजा : खोल विहिरीची साफसफाई करीत असताना श्वास गुदमरून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर येथे ...

लांजा : खोल विहिरीची साफसफाई करीत असताना श्वास गुदमरून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर येथे रविवारी सायंकाळी घडली.उन्हाळ्यामुळे बहुतांशी विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरीत पाणीच नसल्याने विहिरीतील गाळ व कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येते. निवसर वरचीवाडी येथील एका बागेतील १८ फूट खोल विहिरीत असलेला गाळ व साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. निवसर सोनारवाडी येथील विजय श्रीपाद सागवेकर (वय ४४) व नंदकुमार सीताराम सागवेकर (४४) यांच्यासमवेत पालीजवळील बांबर येथील अनिल गोविंद सागवेकर (२८) हे कामासाठी सकाळी आले होते. दुपारी जेवण आटोपून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास या कामगारांची कोणतीच हालचाल होत नसल्याचे विहिरीच्या वर असणाऱ्या कामगारांच्या लक्षात आले. या तिन्ही कामगारांचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत निवसरचे पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांना माहिती दिली. त्यांनी लांजा पोलीसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तातडीने लांजा पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. पाटील, चेतन उत्तेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.