शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धामणी येथे अपघातात तीन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:23 IST

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ट्रक व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीनजण ठार झाले. मृतांमध्ये राजापूर काजिर्डा येथील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ...

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ट्रक व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीनजण ठार झाले. मृतांमध्ये राजापूर काजिर्डा येथील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय हे स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच-०४, ईक्यू- ६५०८) मुंबईहून पाचल (ता. राजापूर)कडे येत होते, तर राजेंद्र्र सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच-०८, डब्ल्यू-१४१४) रद्दी भरून गोव्याहून चिपळूणकडे जात होते. ट्रक व स्कॉर्पिओ धामणी येथे आली असता दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहने भरधाव वेगात असल्याने धडक होताच दोन्ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा फेकली गेली. राजेंद्र्र तानाजी सावंत यांनी या अपघाताची माहिती दिली.या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे. रवींद्र्र व अनिल हे दोन सख्खे भाऊ जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अपर्णा पवार व रसिका पवार यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रसिका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अपर्णा यांच्या छातीला मार लागला असून उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश थिटे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. झगडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.