शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात रंगला जाखमाता देवीचा शिंपणे उत्सव-रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:25 IST

संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची

ठळक मुद्दे फेऱ्याने केली सांगता

देवरूख : संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊ न निघाले होते. 

दुपारपासून गणपती मंदिर येथून फेऱ्याला सुरूवात झाली. फेऱ्यामध्ये बैलगाड्यांमधून रंगांची उधळण करण्यात आली. या उत्सवात वापरण्यात येणारा रंग लाल असतो. लाल रंगाची उधळण हेच कसबा येथील रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य असून, हा लाल रंग विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. या उत्सवावेळी  जाखमातेचा जयजयकार करत लाल रंग एकमेकांवर उडवत शिंपणे साजरे करण्यात आले. या उत्सवाप्रसंगी नवसाचे बोकड व कोंबडी यांचे बलिदान दिले जाते. यानुसार शिंपणे दिनीही नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला. 

यावर्षी जाखमातेच्या दर्शनाचा लाभ संगमेश्वरच्या माहेरवाशिणी पतीसोबत घेतानाचे चित्र पाहावयास मिळाले. या उत्सवासाठी नवविवाहीत महिला पतीसह खास आदल्या दिवशी कसबा संगमेश्वर येथे देवी जाखमातेचे दर्शन घेऊन देवीला फळे वाहतात.. घरातील लहान मुलांनी जावयाला रंगवण्याची पध्दत संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. ही प्रथा आजही पाहायला मिळते. मटण - भाकरी - वडे हा प्रसाद असल्याने मांसाहार करण्याचा वार धरूनच शुक्रवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. कसबा येथील या मंदिराच्या शेजारी रंगांची तळी उभारली जातात. ही तळी या उत्सवाच्या दिवशी फोडतात, याला लेंडी फोडणे असे म्हणतात.  याप्रमाणे लेंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी प्रतिवर्षाप्रमाणे आनंदात पार पडला. मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याहीवर्षी मटण भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. 

सोळजाई देवीचाही शिंपणे उत्सवतमाम आबाल वृध्दांच्या उत्साहाला उधाण आणणारा देवरूखातील ४४ खेड्यांची मालकीण श्री देवी सोळजाई देवीचा शिंपणे उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. या उत्सवाचा रंगपंचमी फेरा हा तमाम जनतेला आकर्षित करणारा ठरला. या शिंपण्याने शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. याचवेळी देवीच्या मंदिर परिसरातून रंगांचा फेरा काढण्यात आला. या फेऱ्यात रंगांनी भरलेल्या बैलगाड्या, टेम्पो यांच्या जोडीला ढोलताशांची साथ होती. फेºयामध्ये मिळणाऱ्या  प्रत्येक नागरिकावर रंगांची उधळण क रण्यात आली. फेरा सोळजाई मंदिरापर्यंत पुन्हा येऊन शिमगोत्सव व शिंपण्याची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHoliहोळी