शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

शेतीपंपाचे हजारो रुपये बिल; शेतकरी हैराण

By admin | Updated: March 11, 2016 00:02 IST

अडूरची घटना : मीटर कापल्याने नारळी-पोफळींची बाग सुकली

असगोली : शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनी आपल्या चुका लपवण्यासाठी आणि मार्चपूर्वी वसुली दाखवण्यासाठी शेतकऱ्याचा नाहक बळी देत असल्याचा प्रकार अडूर नागझरीतील प्रकाश मांडवकर यांच्या बाबतीत घडला आहे.मांडवकर यांनी एप्रिल २००९ साली कागदपत्रांची पूर्तता करून शेती आणि नारळी - पोफळींच्या बागायतीसाठी विद्युत शेतीपंप कनेक्शन घेतले होते. ३ एचपीचा त्यांचा शेती पंप आहे. नवीन मीटरचे पैसे भरुनसुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुना मीटर बसवून दिला. त्यानंतर महावितरणने ३० आॅक्टोबर २००९ साली ११० रुपयांचे पहिले बिल दिले होते, तेही कोणतेही युनिट न पाहता. त्यानंतर चार वर्षांनी मार्च २०१३मध्ये ४७० रुपयांचे बिल दिले, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये ६०० रुपयांचे बिल दिले होते, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. ही सर्व बिले शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी वेळेत त्यांच्या खात्यामध्ये भरली आहेत. वारंवार याबाबत चौकशी करुनसुद्धा तीन महिन्यांनी त्यांना मीटरचे योग्य रिडिंग घेऊन बिले देण्यात आली नाहीत. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी १७,५६० एवढ्या रकमेचे बिल दिले.यावेळी मात्र त्यांनी मीटर रिडिंग घेतले. तब्बल दोन वर्षांनी बिल दिले. महावितरणनेच दिलेल्या माहितीनुसार मीटर बिल हे सरासरी तीन महिन्यांचे ११० युनिट आहे. मात्र, सप्टेंबर २०१५मध्ये ६० युनिट दाखवत असताना तेच डिसेंबर २०१५मध्ये २०,०१५ एवढे युनिट दाखवले आणि १७,५६१ रुपये एवढी रक्कम भरण्यास सांगितल्याने शेतकऱ्याला मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.दिलेल्या नोटीसीनुसार चौकशी सुरु असतानाच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज मीटरची जोडणी बंद केल्याने बागायत सुकू लागली आहे. याबाबत महावितरण कंपनी, गुहागरचे अधिकारी जाधव यांच्याकडे चर्चा केली असता याबाबत म्हणावा तसा खुलासा केला नाही. आम्ही नियमानुसार रिडिंग घेऊन बिल दिले आहे. तुम्हाला मीटर तपासणी करायची असेल तर ५०० रुपये आधी पैसे भरा, मग मीटर कनेक्शन देतो, असा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याच्या विषयाला धुडकावून लावले. याबाबत तहसीलदार, गुहागर यांच्याकडे ही तक्रार केली असता त्यांनी महावितरणचे अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करु शकत नाही. तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्याला दिली आणि विषय थांबवला.या सर्व प्रकारावरून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे न्याय मिळू न शकल्याने शेतकरी प्रकाश मांडवकर यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आधी पैसे भरा, मगच पुन्हा जोडणी करतो, असे महावितरणने स्पष्ट सांगितल्याने जिवापाड वाढवलेली बागायत पाण्याविना सुकून जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)