शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बाप्पाचे आगमन १९ दिवसांनी लांबणार, अधिक मास यंदा श्रावण महिन्यात

By शोभना कांबळे | Updated: July 7, 2023 17:05 IST

अधिक मास यंदा श्रावण महिन्यात आला असून, १९ वर्षांनंतर हा योग आला.

रत्नागिरी : १९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन झाले होते. यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होणार आहे. दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. यंदा हा मास श्रावण महिन्यात आला असून, १९ वर्षांनंतर हा योग आला आहे.हिंदू पंचांगानुसार यंदा मराठी वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. यंदा श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. त्यामुळे श्रावण महिना तब्बल ५९ दिवसांचा असणार आहे. त्यामुळे यावर्षी श्रावणाचे दोन महिने मानले जाणार आहेत. त्यामुळे यंदा श्रावणातील धार्मिक व शुभकार्ये श्रावणाच्या पहिल्या महिन्यात न होता, दुसऱ्या महिन्यात होणार आहेत.यावर्षी मंगळवार, दि. १८ जुलैपासून अधिक मास सुरू होणार असून, तो १६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. तर २६ ऑगस्ट रोजी अधिक मासाची सांगता होणार आहे. याचा परिणाम हिंदू सणांवरही होणार आहे. १५ जुलैला शिवरात्रीचा सण आल्याने त्याच्यावर या अधिक मासाचा परिणाम होणार नाही. मात्र, शिवरात्रीनंतर १५ दिवसांनी येणारा रक्षाबंधनाचा सण अधिक मास आल्याने ४६ दिवसांनंतर म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. याचबरोबर गणेशाचे आगमनही लांबणार आहे. मात्र, यंदा श्रावणात आलेल्या अधिक मासामुळे विघ्नहर्त्याचेही आगमन लांबले असून, भक्तांना तब्बल १९ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा १९ रोजी गणेश चतुर्थी आली आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे २३ रोजी गाैरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. तर दहा दिवसांच्या बाप्पांना २८ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव