शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडगडी कालव्याचे पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 21:15 IST

हालचाली सुरु : कालवा सफाईचे काम वेगात

मार्लेश्वर : गडगडी धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी ग्रामस्थांना देण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेला कालवा सफाईचे काम यंत्राच्या सहाय्याने सुरू झाले आहे. आरपीआयचे तालुकाध्यक्ष अ. वि. जाधव यांनी चार दिवस आपल्या सहकाऱ्यांसह पाण्यासाठी छेडलेल्या बेमुदत उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे. यामुळे जाधव यांचे उपोषण खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे.डाव्या कालव्यातून धरणाचे मिळणारे पाणी चौदा किमीपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना मिळावे, किंबहुना तो आपला हक्क आहे. या मागणीसाठी जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घाग व सुदाम गमरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देवरूख तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अनेक अधिकाऱ्यांनी जाधव यांची भेट घेऊन उपोेषण स्थगित करण्याची विनंती कली होती.मात्र, कालव्याचे पाण्याबाबत ठोस निर्णय कधी मिळणार? याची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार जाधव यांनी केला होता. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन २८ फेब्रुवारीपूर्वी कालव्याची सफाई करुन पाणी दिले जाईल, अशी हमी दिली. दिलेल्या मुदतीत पाणी न मिळाल्यास पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करू, असा इशारा देऊन जाधव यांनी आंदोलन स्थगित केले होेते. आंदोलन स्थगितीसाठी दिलेला शब्द अखेर शासनाला पाळावा लागला. पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली कालवा सफाई त्यातील मोठमोठे दगड, माती, वृक्ष तोडून आधुनिक यंत्राने सफाईचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. उपोषणाप्रसंगी देवरूख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह स्वमालकीच्या जागेत न्यावे, ही मागणीदेखील करण्यात आली होती. शासनाने १० एप्रिलपूर्वी हे वसतिगृह स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. ही ग्वाही पूर्ण न केल्यास सामाजिक न्याय विभाग, रत्नागिरी येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारु, असेही जाधव यांनी जाहीर केले आहे. दरम्यान कालव्याचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांना आता पाणी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. (वार्ताहर)गडगडी धरणाचे पाणी १४ किमीपर्यंत मिळाल्यास येथील शेतकऱ्यांना उन्हाळी शेतीचाही लाभ घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे कालव्याचे काम त्वरित होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता हालचाली सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.