शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अखंड राज्याच्या वल्गना करू नयेत

By admin | Updated: May 4, 2016 23:50 IST

महेंद्र नाटेकर : स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा

कणकवली : ज्यांना एकत्र कुटुंब ठेवता येत नाही, त्यांनी अखंड महाराष्ट्र राज्याच्या वल्गना करू नयेत, अशी टीका प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र भारत निर्माण करण्याबरोबरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात कोकणी माणूस आघाडीवर होता. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समतोल विकासाचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देऊन कोकणाची उपेक्षा केली. त्यांच्यानंतर आलेल्या उर्वरित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही यशवंतरावांची री ओढली. ७२० किलोमीटर लाभलेली किनारपट्टी, अरबी समुद्र, मासे, जागतिक बंदरे, पर्यटनस्थळे, घनदाट जंगले, वनौषधी, दीड दोनशे इंच कोसळणारा पाऊस, बुद्धिमान व प्रतिभावंत कोकणी माणूस, आदी कोकणची बलस्थाने आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून कोकणचा विकास करण्याऐवजी उर्वरित महाराष्ट्राच्या नेतृत्वाने नियोजनबद्ध प्रयत्न करून कोकणचा विकास रोखला. परराज्यांतील शक्तिशाली ट्रॉलर्सनी कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त केले, करीत आहेत. जागतिक दर्जाची बंदरे असूनही त्यांचा विकास केला नाही. येथील शेती-बागायतीचा विकास न करता कोकणाला आपली बाजारपेठ बनविली. शासन-प्रशासनाने येथील वृक्षांची कत्तल करून डोंगर बोडके केले. प्रचंड पाऊस पडूनही धरणे अपूर्ण ठेवली किंवा रद्द केली. त्यामुळे सर्व पाणी समुद्रात जाते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील दोन विधानसभा मतदारसंघ घटले आहेत. वैद्यकीय सेवा पुरेशी नसल्याने कोल्हापूर, गोव्याकडे प्राण वाचविण्यासाठी धाव घ्यावी लागते. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, तांत्रिक शिक्षण, विद्यापीठ, आदी नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. विना अनुदान व इतर सर्वच शिक्षण संस्थांमध्ये लाच घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.यावेळी सुरेश हाटे, मोतिराम गोठिवरेकर, वाय. जी. राणे, संजय हंडोरे, प्रा. प्रकाश अधिकारी, शिवाजी देसाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती करणारच कोकणची धरणे झालीच पाहिजेत; पण ती कोकणी माणसासाठी. धरणे बांधल्यामुळे पेयजलाबरोबरच पिके घेता येतील. रेल्वे आहे ती चिकमंगळूरला जाण्यासाठी. हायवे आहे तो गोव्याला जाण्यासाठी. कोकणासाठी काहीही नाही. कोकणच्या सर्व समस्या न सोडवता राज्याचे तुकडे पाडू देणार नाही, अशी वल्गना करणाऱ्यांचा निषेध करतो.ज्या कोकणी माणसांनी देश स्वतंत्र केला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला, तो कोकणी माणूस सर्वंकष विकासासाठी गोवा, उत्तरांचल, मिझोराम, छत्तीसगड, आदी राज्यांप्रमाणे घटनादत्त अधिकाराचा उपयोग करून स्वतंत्र कोकण राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.