शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

अपंग, बेरोजगारांसाठी कार्य करण्याचा त्यांचा ध्यास

By admin | Updated: August 29, 2014 23:14 IST

संवाद सेवाभावी संस्था : लांजा तालुक्यात अपंग आणि बेरोजगार तरूणांना दिलासा

कुवे : सध्या बेरोजगारांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यातून ग्रामीण भागातील बेरोजगारांची समस्या तर अधिकच जटील आहे. मात्र, अशांना रोजगाराची संधी मिळवून देण्याची संधी लांजात एकत्र आलेल्या सुशिक्षित तरूणांनी मिळवून दिली. याचबरोबर अपंगांनाही शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी हे तरूण ‘संवाद सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून झटत आहेत.सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व अपंगांना त्याच्या मिळणाऱ्या शासकीय सुविधा, सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवणे, सामाजिक उपक्रम राबविणे, अशी अनेक उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील प्रत्येक स्तरावरील समविचारी जनतेला तसेच सुशिक्षित तरुणांना एकत्र करुन लांजात ‘संवाद सेवाभावी संस्थे’चे कार्य अनेक वर्षे सुरु आहे.संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे या छोट्याशा संस्थेचे मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संस्थेने गावागावात जाऊन २३० ते २५० अपंगांना आतापर्यंत शासकीय प्रमाणपत्र मिळवून दिली आहेत. तसेच २०० तरुणांना एकत्र करुन लहान-मोठे रोजगार मिळवून दिले आहेत. तसेच तरुणांना स्वयंरोजगार करण्यास मदत व्हावी म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला आहे. जातीचे दाखले, शासकीय दाखले, कागदपत्रांसाठी सर्वसामान्याची होणारी धावपळ कमी व्हावी, यासाठी त्यांना माहिती मिळावी, यासाठी संस्थेने काही माणसे नेमली आहेत. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून गरीब जनतेला आता आधार मिळाला आहे. रोजगार मार्गदर्शन, शिबिर, व्यसनमुक्ती, जनजागृती, रक्तदान शिबिर, नेत्रदान यांसारखे अनेक उपक्रम संस्था लांजा येथे राबवत आहे. नंदकुमार कांबळे यांनी या संस्थेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मदत म्हणून सिद्धिविनायक ट्रस्ट, पाटील ट्रस्ट यांसारख्या नामवंत सेवाभावी संस्थांकडून मदत मिळवून दिली आहे. शासनाच्या प्रत्येक योजना शाळांपासून प्रत्येक घरातील कामगारांपर्यंत पोचवण्याचे काम संवाद सेवाभावी संस्था करीत आहे.या संस्थेच्या माध्यमातून अपंगांना जास्तीत जास्त मदत व्हावी व बेरोजगारांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी आता मोठमोठे उपक्रम राबवित आहे. या माध्यमातून याचा लाभ लांजा तालुक्यातील जास्तीत जास्त अपंग तरुणांनी तसेच इतर सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा, यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या संस्थेने केले आहे. (वार्ताहर)