शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या घरातच चोरी

By admin | Updated: March 31, 2017 22:55 IST

पोलिसाच्या घरातच चोरी

रत्नागिरी : आजवर सर्वसामान्य नागरिकांची घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क पोलिस वसाहतीतील पोलिसाच्या घरालाच लक्ष्य केले आहे. कुवारबांव पोलिस वसाहतीतील सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी २८ तोळे म्हणजेच सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. चोरट्यांची टोळी जेरबंद झाल्यानंतरही चोऱ्या होतच असल्याने आता पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी दुकाने फोडणारी टोळी शहर पोलिसांनी जेरबंद केली. त्यानंतर तरी चोरीचे सत्र बंद होईल, अशी अशा व्यक्त करण्यात येत होती; परंतु आता पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली असून, या चोरट्यांनी चक्क सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या घरालाच लक्ष्य केले आहे. प्रणाली प्रवीण यादव (३८, कुवारबांव) या आपल्या कुटुंबासोबत कुवारबांव पोलिस वसाहतीमध्ये राहतात. प्रणाली यांचे सासरे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग यादव यांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे गुरुवारी रात्री यादव कुटुंबीय त्यांना उपचारांसाठी कोल्हापूर येथे घेऊन गेले. त्यांच्या घरात कोणीही नव्हते. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी वसाहतीत प्रवेश केला आणि यादव यांचा बंद फ्लॅट फोडला.आजूबाजूच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा सुगावा लागू नये, यासाठी या चोरट्यांनी शेजारच्या सर्व फ्लॅटच्या दरवाजांना कडी लावून घेतली. प्रणाली यादव यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटे आतमध्ये गेले. बेडरूममधील कपाट फोडून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे २८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याच कॉलनीतील दुसरा फ्लॅटही या चोरट्यांनी फोडला; परंतु या फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना यादव यांचा फ्लॅट फोडला गेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याची खबर तत्काळ प्रणाली यादव यांना दिली. त्यांनी रत्नागिरीत येऊन शहर पोलिस स्थानक गाठले. त्यानुसार गुन्हा दाखल होण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यत सुरू होते. चोरीची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (वार्ताहर)