शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मंचाबाहेरच रंगले नाट्य, रंगकर्मींमध्ये संताप

By admin | Updated: February 5, 2016 23:42 IST

सादरीकरण फक्त परीक्षकांपुरतेच करण्याचा प्रयत्न? परीक्षकाच्या वक्तव्यामुळे तीव्र नाराजी

रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाची ५५ वी संगीत राज्य नाट्य स्पर्धा शेवटाकडे झुकत चालली असतानाच एका परीक्षकांनी केलेल्या आडमुठ्या नि अनाकलनीय वक्तव्यामुळे तिला वेगळाच रंग चढला आहे. स्थानिक रंगकर्मी बाहेरून आलेल्या स्पर्धकांना वेगवेगळी मदत केल्याची उदाहरणे असतानाही एका परीक्षकाने स्थानिकांविरूद्धच मतप्रदर्शन केल्यामुळे रंगकर्मींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.संगीत राज्य नाट्य स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असतानाच एका परीक्षकांच्या वागण्यामुळे त्यांच्या स्पर्धाविषयक दृष्टिकोनावर संशयाचे बोट ठेवले जात आहे. या स्पर्धेत नुकत्याच झालेल्या बेगम सारंगा नाटकाच्या वेळी संबंधित कलाकार लेपल (कॉलर माईक) घ्यायला विसरली. अशावेळी प्रसंगावधान राखून स्टँड माईक घेतला जातो. मात्र ऐनवेळी गोंधळल्यामुळे त्या कलाकाराला तसे सुचले नाही. सदर परीक्षकांनी त्याचे खापर साऊंड सिस्टिमवर फोडले. प्रयोगादरम्यान पडदा उघडण्यात काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र परीक्षकांनी स्वत: त्यात हस्तक्षेप केला. या तांत्रिक बिघाडाचे खापरही त्यांनी स्थानिक संघांवर फोडले.या केंद्रावरील प्रेक्षकसंख्येने परीक्षकांवर दडपण येते, असे विधानही याच परीक्षकांनी केले आहे. वास्तविक ही स्पर्धा शासनमान्य असून, त्याला रसिकाश्रय लाभावा या एकमेव उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. संगीत राज्य नाट्यस्पर्धेला रत्नागिरीत गेली काही वर्षे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकांची सिझन तिकीट ज्यावेळी सुरू झाली, तेव्हा दीड तासात दीड लाखाहून अधिक रकमेची सिझन तिकिटे विकली गेली. त्यामुळे नाटकांना येणारे प्रेक्षक हे कोण्या एका संघासाठी आलेले नसून, ते संगीत नाटकावरील प्रेमापोटी आलेले आहेत, असा मुद्दा एका रंगकर्मीने मांडला.संगीत रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून शासन या स्पर्धा भरवून राज्यातील हौशी रंगकर्मीना पाठबळ देत असतानाच या परीक्षकांच्या वक्तव्यामुळे वातावरण गढुळ झाले आहे. (प्रतिनिधी)