शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग अजून तसाच

By संदीप बांद्रे | Updated: November 3, 2023 17:17 IST

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा ...

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा भाग काढण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाणार आहे. केंद्रीय तज्ज्ञ समितीचा चौकशी अहवालही अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागास प्राप्त झालेला नसल्याने उड्डाणपुलाच्या सर्वच कामाला विलंब लागण्याची चिन्हे आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून शहरातून जात असलेल्या उड्डाणपूलाचे काम सुरू असताना पंधरा दिवसांपूर्वी त्यातील काही भाग लॉंचरसह कोसळला. या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तज्ज्ञ समिती तयार करण्यात आली. या समितीतील टंडन कन्सल्टनचे मनोघ गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सचे सुब्रमण्य हेगडे यांच्या समितीने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. पुलाचे बांधकाम करणाऱ्यांमधील कंत्राटदार, निरीक्षण करणाऱ्या कंपन्यांचे अभियंते, अधिकारी यांचे जबाब घेतले होते. कोंडमळा येथे गर्डर बनवले जातात, त्या कास्टींग प्लान्टमध्ये जाऊन तेथील साहित्याचीही पाहणी करुन चौकशी केली. आठवडाभरात या समितीकडून प्राथमिक अहवाल महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्याना प्राप्त होणार होता. मात्र, तो अजूनही प्राप्त झालेला नाही.

या दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग अजूनही तसाच आहे. त्यावरील लाँचर यंत्रणाही तशीच लोंबकळत आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने पुलाचे चित्र काहीसे भीतीदायक आहे. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोसळलेला पूल, त्यावरील लाँचरसह यंत्रणा ही वजनशीर आहेत.

शिवाय त्यामध्ये टाकण्यात आलेल्या केबल्सही व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग आणि लाँचर यंत्रणा कशी काढायची याबाबतचा आराखडा तयार केला जात आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण