शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

चिपळुणातील उड्डाणपुलाचे कोसळलेले गर्डर हटविण्यासाठी यंत्रणा अखेर दाखल

By संदीप बांद्रे | Updated: December 7, 2023 18:42 IST

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर, लाँरसह अन्य साहित्य हटवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नागपूर येथील ...

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर, लाँरसह अन्य साहित्य हटवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नागपूर येथील माते ऍन्ड असोसिएटस् या तज्ज्ञ एजन्सीची टिम येथे दाखल झाली आहे. त्यामुळे उड्डाणपूल कोसळल्यानंतर तब्बल पावनेदोन महिन्यानंतर ते हटविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.  पेढे-परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्प्यातील चोपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण गेल्यानंतर उड्डणपूल कामाला गती देण्यात आली. मात्र काम सुरू असताना 14 ऑक्टोबरला उड्डाणपूलाचा काही भाग लाँचरसह कोसळला. त्यानंतर या उड्डाणपुलासदंर्भात शासनाने तज्ज्ञ समिती नियुक्त केली. या नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्राथमिक बैठक झाली होती. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर आणि लाँचर काढण्याचे काम अडचणीचे असल्याने अशी कामे केलेल्या तज्ञ एजन्सीची मदत घेण्याचे ठरले होते.  त्यानुसार नागपूर येथील माते ऍन्ड असोसिएटस् या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचा निर्णय झाला. त्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाने मान्यता दिली. काम करताना एकाचवेळी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी महामार्ग कंत्राटदार ईगल कंपनीने आणखी एक लाँचर देखील आणला आहे. परंतू लटकणारे गर्डर जमिनीवर उतरवणे व त्यातील केबल सोडवणे हे अत्यंत कठीण व जिकीरीचे काम असल्याने त्यासाठी तज्ज्ञ एजन्सीचा सल्ला आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या कामाला मान्यता मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या एजन्सी टिममधील सदस्य येण्यास सुरूवात झाली आहे.  शुक्रवारी सायंकाळपर्यंत या एजन्सीचे अधिकारी येथे दाखल होणार आहेत. लिफ्टसह काही यंत्रणाही मागविण्यात आली आहे. येथे यंत्रणा दाखल होताच सेटअप पूर्ण झाल्यानंतर गर्डर आणि लाँचर हटविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. गर्डर हटविण्याचे काम करताना शक्यता महामार्गी एक लेन बंद ठेवावी लागणार असल्याची शक्यता आहे. तज्ज्ञ समितीच्या पाहणीनंतरच प्रशासन त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण