शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न घरच्यांनी ठरवलं, अन् ‘ट्युनिंग’मुळे प्रेम आपोआप वाढलं; रत्नागिरी जि.प.च्या सीईओंची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By मेहरून नाकाडे | Updated: February 14, 2023 13:44 IST

एकमेकांवरील दृढ विश्वास, पाठिंबा यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत

मेहरून नाकाडेरत्नागिरी : इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, नोकरीही मिळाली. त्यामुळे घरच्यांनी लग्नाची घाई केली. वडिलधाऱ्यांच्या पसंतीने ‘साैम्याश्री’ यांच्याशी लग्न झाले. लग्नाला सात वर्षे झाली. संसाराच्या वेलीवर फूल उमलले. चार वर्षांच्या ‘अर्ना’मुळे आमच्या जीवनात आनंदाचा महापूरच आला. दोघांची क्षेत्र भिन्न आहेत, मात्र एकमेकांवरील दृढ विश्वास, पाठिंबा यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले. ‘व्हॅलेंटाईन दिना’चे औचित्य साधून ‘लोकमत’ ने साधलेल्या संवादात त्यांनी आपले मत व्यक्त केले.विजयनगर जिल्ह्यात (कर्नाटक) माझे गाव. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, मला नोकरीही मिळाली, घरच्यांच्या संमतीने लग्नही झाले; परंतु ‘आयएएस’ व्हायची मनीषा होती. मी माझी इच्छा पत्नीपुढे व्यक्त केली. तिने पाठिंबा दर्शविला. मी नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. वास्तविक माझा प्रशासकीय विषयांकडे कल तर तिला सांस्कृतिक क्षेत्राची विशेष आवड. तिने एमबीए केले आहे. अभ्यासात मला तिची विशेष मदत झाली. पास झालो त्यावेळी तर तिचा आनंद औरच होता.आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करतो, विचार व्यक्त करतो. तिला गायन, नृत्याची आवड आहे. त्यामुळे मी तिच्या आवडीला नेहमीच प्रोत्साहन देतो. तिच्या संकल्पना मला कामात उपयुक्त ठरतात. कार्यक्रमाचे आयोजनात तर तिचे मार्गदर्शन परफेक्ट असते. त्यामुळे ॲरेंज मॅरेज असले तरी लग्नानंतर आमचे प्रेम बहरतच गेले. कुटुंबीयांचा आम्हाला वेळोवेळी पाठिंबा लाभलाच; परंतु पत्नीची साथ महत्त्वाची ठरली आहे. मुलगी लहान आहे, तिचे संगोपन व काैटुंबिक सर्व जबाबदाऱ्या ‘साैम्याश्री’ नेटकेपणाने पार पाडते. दोघांची क्षेत्र भिन्न असली तरी एकमेकांवरील सार्थ विश्वासच आमची प्रेमाची गाडी पुढे नेण्यास उपयुक्त ठरत आहे. घरातील वातावरण आनंददायी, प्रसन्न ठेवण्यात पत्नीचा वाटा मोठा असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी सांगितले.आनंददायी सहजीवनव्हॅलेंटाईन दिनाचे एक दिवसापुरते महत्त्व न राहता पती-पत्नीचे नाते कायमच आनंदी, प्रेमळ, निकोप असावे, असे माझे मत आहे. आमची क्षेत्र भिन्न असली तरी एकमेकांना आम्ही पाठिंबा देतो. ‘सरस’ आयोजनात तिची संकल्पना उपयुक्त ठरली. जिल्हा परिषद स्नेहसंमेलनात सामूहिक नृत्यात सहभागी होत, गायनही सादर केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे