शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भव्यदिव्य 'शिवबा' महानाट्याने रत्नागिरीकरांवर घातलं गारुड 

By शोभना कांबळे | Updated: February 13, 2024 14:44 IST

रत्नागिरी : ३५० वर्षे जुलमातून, गुलामशाहीचे काहूर माजलेले, गुलामशाहीने सह्याद्रीच्या कड्यांना भेगा पडताहेत. धरणी माता अन्यायाने, जुलमाने तप्त झाली ...

रत्नागिरी : ३५० वर्षे जुलमातून, गुलामशाहीचे काहूर माजलेले, गुलामशाहीने सह्याद्रीच्या कड्यांना भेगा पडताहेत. धरणी माता अन्यायाने, जुलमाने तप्त झाली आहे. पारतंत्र्याची भीषण काळरात्र संपवण्याची आता वेळ आली आहे.. स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहे. युध्द हे फौजेच्या जिवावर नाही तर निष्ठेवर लढले जाते, याचा साक्षात्कार घडविणारे कोकण कला अकादमी प्रस्तुत प्रेरणा प्रोडक्शन निर्मित इतिहासाच्या पानावरचं एक सुवर्ण पान, ८० कलाकरांच्या भव्यदिव्य 'शिवबा' महानाट्याने रत्नागिरीकरांवर गारुड घातलं.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रा. प्रदीप ढवळ लिखित आणि मंदार टिल्लू दिग्दर्शित 'शिवबा' या महानाट्याचा भव्य प्रयोग मंगळवारी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचच्यावतीने नमन ही पारंपरिक लोककला सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या नमनाने झाली.  नमनानंतर रामायणातील एक छोटा प्रसंग सादर करण्यात आला. सुरुवातीला 'वस्त्रहरण' नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर, प्रा. ढवळ, टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यावेळी उपस्थित होते.संत एकनाथांच्या 'दार उघड बया, दार उघड .'या भारुडापासून महानाट्याची सुरुवात होते. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते. स्वराज्याचे प्रेरणास्थान शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका विशेष अधोरेखित होते. आई तुळजा भवानीच्या साक्षीने स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तत्वाने पूर्ण झाले. उत्तम सादरीकरण संगीत, चलचित्राच्या माध्यमातून पार्श्वभूमी शिवकाळाचा इतिहास आणि प्रसंग जिवंत केले आहेत.स्वराज्याची संकल्पना, त्यामागची प्रेरणा आणि इतिहास नव्या पिढीसमोर उभा केला आहे. तलवार बाजी, दांडपट्टा आणि 'हर..हर.. महोदव..च्या गर्जनेने थंडीतही भान विसरायला लावून रसिक प्रेक्षकांना देखील स्फूरण चढले आणि समस्त रसिक प्रेक्षकांच्या गर्दीतूनही मग 'हर हर महादेव..छत्रपती शिवाजी महाराज की जय..!' केवळ आणि केवळ हाच जयजयकार होताना अनुभवला मिळाला. नाटक संपल्यानंतरही रसिकांच्या मनावर या नाटकाचे गारूड कायम हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी