शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या रानभाज्या महोत्सवाकडे अनेकांची पाठ; अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच खरेदी केल्या भाज्या 

By संदीप बांद्रे | Updated: August 11, 2023 19:09 IST

तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल

चिपळूण : रानभाज्यांविषयीची जनजागृती व त्याची खरेदी, विक्री व्हावी, यादृष्टीने कृषी विभागाने शुक्रवारी (११ ऑगस्ट) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे तालुकास्तरीय या महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती न लाभल्याने अखेर हा महोत्सव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच अनुभवला. इतकेच नव्हे त्यांनीच सर्वाधिक भाज्या खरेदी केल्या. यातूनच रानभाज्या महोत्सव कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला होता की काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.बहुगूणी असणाऱ्या रानभाज्या केवळ पावसातच मिळत असल्याने त्यांचा स्वाद घेण्यासाठी नागरिक आवर्जून वाट पाहत असतात. याशिवाय आजच्या दैनंदिन जीवनातील भाज्या महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून रानभाज्या ठरत आहेत. रानभाज्याविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावे त्याचे महत्त्व कळावे, याशिवाय या भाज्याची महोत्सवाद्वारे खरेदी विक्री व्हावी, यातूनच शेतकऱ्यांसह महिला बचत गटांची आर्थिक उलाढाल व्हावी यासाठी दरवर्षापमाणे यंदाही तालुका कृषी विभागातर्फे पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता.तालुकास्तरीय असणाऱ्या महोत्सवात कृषीने गाजावाजा न केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, तर इतर नागरिकही उपस्थित नव्हते. शिवाय शंभरहुन अधिक तालुक्यात बचत गट असताना रानभाज्या विक्रीसाठी तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, गर्दी न झाल्याने रानभाज्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न काहीसा बारगळला. विशेष म्हणजेच पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्याचा महोत्सव आयोजित करण्यात आल्याने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची महोत्सव बघण्यासाठी, तर रानभाज्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. यातूनच हा रानभाज्या महोत्सव शेतकरी, बचत गट, नागरिक यांच्यासाठी न भरवता तो कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला, की काय अशी चर्चा सुरू हाेती. बहुगूणी असलेल्या रान भाज्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय कार्यालयापेक्षा एखाद्या महाविद्यालयात किंवा विभागवार घेणे अपेक्षित होते, असेही काहींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी