शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

देशातील पहिलं महिला कृषी महाविद्यालय कोकणात, 'या' शिक्षण संस्थेला झालं मंजूर

By मेहरून नाकाडे | Updated: July 22, 2023 13:47 IST

रत्नागिरी : कृषी शिक्षणाकडे मुलींचा वाढता कल लक्षात घेता, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे तर्फे चिपळूण ...

रत्नागिरी : कृषी शिक्षणाकडे मुलींचा वाढता कल लक्षात घेता, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे तर्फे चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेसाठी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयासाठी मंजूर केले आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय ठरले आहे.कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा बहुमान मिळविला आहे. या संस्थेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम सुरू असून या संस्थेचा २५० एकर परिसर आहे. आंबा, काजू, नारळ, पोफळी, भात व इतर लागवड, गांडूळ खत प्रकल्प, पोल्ट्री, डेअरी प्रकल्प सुरू आहेत. ही संस्था कृषी महाविद्यालयातून प्रॅक्टीकल पदवीधर तयार करण्याचे कार्य गेली २३ वर्षापासून करत आहे. कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या कल्पनेतून हे महिला कृषी महाविद्यालय मंजूर झाले आहे. भारतातील एकूण शेती करणाऱ्यांपैकी ७० टक्के महिला शेती करतात. त्यामुळे भविष्यात कृषी शिक्षण घेतलेल्या महिला शेतीत उतरतील व आधुनिक शेती करतील, व उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास आहे.जिजाामाता महिला कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या महिला कृषी महाविद्यालयाचा कोड नंबर ११३११ असा आहे. ज्या मुलींनी इतर कृषी महाविद्यालयांना प्राधान्यक्रम दिला असेल तर तो बदलून जिजामाता कृषी महाविद्यालयास प्राधान्यक्रम देवू शकतात. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह, मेस, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, सुसज्ज ग्रंथालय, उच्चशिक्षित व तज्ञ प्राध्यापक वर्ग या बाबींचीही उपलब्धता करण्यात आली आहे. सर्व सोयींनीयुक्त असे हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय, असल्याचा विश्वास डाॅ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला आहे. बारावी, सीईटी परीक्षेतील गुणांवर प्रवेश होणार असून चारवर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना बीएसएसी अॅग्री (ओनर्स) ही पदवी मिळणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्रcollegeमहाविद्यालय